ताज्या बातम्या

MNS Deepotsav 2025 : ठाकरे बंधू दिवाळीतच राजकीय धमाका करतात की काय? राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची राजकीय घटना घडणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावर मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) पक्षाच्या वतीनेदीपोत्सव (MNS Deepotsav 2025) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची राजकीय घटना घडणार

  • ठाकरे बंधू दिवाळीतच राजकीय धमाका करतात की काय?

  • शिवाजी पार्कवरुनच राजकीय धमाका होतो की काय?

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची राजकीय घटना घडणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावर मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) पक्षाच्या वतीनेदीपोत्सव (MNS Deepotsav 2025) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, यंदाचा दीपोत्सव विशेष ठरणार आहे. कारण, शिवाजी पार्कवरील मनसेच्या दीपोत्सव 2025 सोहळ्याचे उद्घाटन यंदा चक्क शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) करणार आहेत. हा कार्यक्रम आज 17 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजता होणार आहे. यामुळे ठाकरे बंधू दिवाळीतच राजकीय धमाका करतात की काय? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

उद्धव ठाकरे यांचे नाव मनसेच्या दीपोत्सवाच्या अधिकृत पत्रिकेत छापण्यात आले असून, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा चांगलीच रंगली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील वाढती जवळीक, एकमेकांच्या घरी होणाऱ्या भेटीगाठी, आणि आता दीपोत्सवाच्या मंचावर होणारी जाहीर एकत्र उपस्थिती, या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार करता, शिवसेना आणि मनसेच्या संभाव्य युतीच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.

गेल्या दोन महिन्यांत ठाकरे बंधूंमध्ये तब्बल 6 वेळा भेटी झाल्या आहेत. त्यातील दोन भेटी या बंद दाराआड झाल्या आहेत. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्याआधी उद्धव ठाकरे यांनी 'शिवतीर्थ' या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. या दोन्ही नेत्यांची अशी सलग आणि उघड भेटगाठ ही गेल्या अनेक वर्षांत पाहायला मिळालेली नव्हती.

शिवाजी पार्कवरुनच राजकीय धमाका होतो की काय?

दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना आणि मनसे एकत्र येणार असल्याचे आता जवळपास निश्चित मानले जात आहे. केवळ, औपचारीक घोषणा आणि जागावाटप बाकी असल्याचा अंदाज राजकीय जाणकार आणि दोन्ही पक्षातील पदाधिकारी व्यक्त करत आहेत. त्यामुळे, दिवाळीत शिवाजी पार्कवरुनच राजकीय धमाका होतो की काय?असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा