ताज्या बातम्या

Indoor plants : तुमच्या घरामधील झाडं तुम्हाला खरंच ऑक्सिजन देणार का? जाणून घ्या

आज 26 सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिन आहे. या दिवशी तुम्हाला आरोग्याबाबत अनेक मोलाचे सल्ले दिले जातील. ज्यामध्ये हवा स्वच्छ ठेवणे, वायु प्रदुषण टाळणे यासाठी झाडं लावणं अत्यंत गरजेचं आहे.

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • आज 26 सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिन

  • झाडंच तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात ?

  • वायु प्रदुषण टाळण्यासाठी झाडं लावणं अत्यंत गरजेचं

आज 26 सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिन आहे. (Indoor plants) या दिवशी तुम्हाला आरोग्याबाबत अनेक मोलाचे सल्ले दिले जातील. ज्यामध्ये हवा स्वच्छ ठेवणे, वायु प्रदुषण टाळणे यासाठी झाडं लावणं अत्यंत गरजेचं आहे. मात्र जेव्हा तुम्ही ऑक्सिजनसाठी घरामध्ये लावले जाणारे झाडंच तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात.

दिल्लीसारख्या शहरांमध्ये निरोगी हवेसाठी नागरिकांकडून घरामध्ये विविध झाडं लावली जातात. जेणे करून हवा स्वच्छ राहील आणि श्वसनाचे आजार कमी होण्यास मदत होईल. यामध्ये तुळस, कोरफड, स्नेक प्लांट,एरिका पाम, स्पायडर प्लांट यांसारख्या झाडांचा समावेश आहे. ही झाडं भरपूर प्रमाणात ऑक्सिजन सोडतात. तसेचे ते औषधी गुणधर्मांसाठी देखील ओळखले जातात.

मग तुम्ही म्हणाल मग ही झाडं नकारात्मक कशी ठरतात. तर अनेक जण ही झाडं घराच्या अंगणात परिसरात लावण्याऐवजी बेडरूम्समध्ये लावतात. मग दिवसा जरी ही झाडं ऑक्सिजन सोडत असली तरी ती रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात. त्यामुळे झोपण्याच्या खोलीमध्ये अशाप्रकारे रात्री कार्बन डायऑक्साईड पसरल्याने आणखी आजार उद्धभवण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे काही तज्ज्ञ सांगतात की, बेडरूम्समध्ये झाडं लावणं तेवढं हानिकारक देखील नाही. कारण ही झाडं बाष्पीभवना दरम्यान ग्लुकोज देखील सोडतात. तर ते कार्बन डायऑक्साईड अत्यंत कमी प्रमाणात सोडतात. जे माणसाच्या एका श्वासाच्या वेळी सोडल्या जाणाऱ्या कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणाच्या देखील अनेक पटींनी कमी असतो. देखील एका खोलीमध्ये तरी 5 ते 6 पेक्षा जास्त झाडं नसावित जेणे करून त्यांची देखभाल आणि व्हेंटीलेशन देखील संतुलित राहिलं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा