Beed Beed
ताज्या बातम्या

Beed : बीडमध्ये अजित पवार गटाला धक्का; योगेश क्षीरसागर भाजपमध्ये प्रवेश करणार?

; योगेश क्षीरसागर भाजपच्या तिकिटावर निवडणुकीसाठी सज्ज

Published by : Riddhi Vanne

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

बीडमधील राजकारणात एक मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर, अजित पवार गटाचे नेते योगेश क्षीरसागर भाजपमध्ये प्रवेश करण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर येत आहे.

बीड नगर परिषदेत भाजपच्या वाढत्या प्रभावाच्या संदर्भात अनेक चर्चा सुरू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश क्षीरसागर हे मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेसाठी भाजपच्या तिकिटावर निवडणुकीसाठी उभे राहण्याची शक्यता आहे.

याआधी, योगेश क्षीरसागर हे अजित पवार गटातून बीड विधानसभेची निवडणूक लढवले होते. पण बीडमधील राजकीय संघर्ष आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या हस्तक्षेपामुळे ते नाराज झाले आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे बोलले जात आहे. योगेश क्षीरसागर यांच्या पक्षांतरामुळे बीडमधील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसू शकतो.

थोडक्यात

  • बीडमधील राजकारणात एक मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे..

  • अजित पवार गटाचे नेते योगेश क्षीरसागर भाजपमध्ये प्रवेश करण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर येत आहे.

  • बीड नगर परिषदेत भाजपच्या वाढत्या प्रभावाच्या संदर्भात अनेक चर्चा सुरू आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा