ताज्या बातम्या

राजीनामा घेऊ तोही व्याजासहित..अमोल मिटकरी याचं अब्दुल सत्तार यांच्या विरोधात ट्विट

Published by : Siddhi Naringrekar

अब्दुल सत्तार पुन्हा एकदा विरोधकांच्या आरोपावरून चर्चेत आले आहे.शिंदे-भाजप सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सत्तार यांनी वाशिमच्या घोड बाभूळ परिसरातील 37 एकर 19 गुंठे गायरान जमिनीचं सत्तार यांनी एका व्यक्तीला अनधिकृत रित्या वाटप केल्याचा आरोप आहे. यावरून विधानसभेत अजित पवारांसह विरोधकांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यावर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. 'राजीनामा घेऊच तोही व्याजासहित..,' असं मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

यावर अब्दुल सत्तार यांनी प्रतिउत्तर दिले आहे की, माझ्यावर झालेले आरोप सभागृहात झाले असल्याने याला उत्तर देखील सभागृहातच देणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. त्यामुळे आता अब्दुल सत्तार आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

"परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान "; ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी केले गंभीर आरोप

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा