आज सकाळपासून राज्यांत पावसाने हाहा:कार कडून सोडले आहे. त्यामुळे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले त्यांचा आढावा घेण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे गेले होते. माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र सुरु केले आहे. त्यावेळेस आदित्य ठाकरे म्हणाले की, "हा काही पहिला पाऊस नाहीये. भुयारी मेट्रो ॲक्वालाईनच्या पाहणीला गेलो असता मेट्रो सांगितले की, सांडपाणी घुसलय आणि संरक्षक भिंत फुटली आहे. मग काम कसलं केलं, दोन आठवड्यापुर्वी उद्घाटन करण्याचे नाटक का केलं? आदित्य ठाकरे यांचा महायुती सरकारला सवाल केला आहे.
पुढे आदित्य ठाकरे म्हणाले की, "रस्त्याचा घोटाळा सातत्याने सरकार समोर आम्ही आणले आहे. अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याकडे बैठक झाली. पण कुठेही सुधारणा झाली नाही, आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका केली आहे. मुंबईचे हाल भाजपच्या हाती गेल्यापासून होत आहे. सरकारचा खोटारडेपणा लोकांसमोर आला. मुंबई खड्डे मुक्त न होता त्यांनी त्याच्या खिशातील खड्डे भरुन काढले आहेत. भाजपाला मी सांगेन, राजकारण फोडाफोडी बंद करा आणि मुंबई, ठाणे, पुणे या शहराकडे लक्ष द्या. एकनाथ शिंदेचा खोटारडेपणा समोर आला. ते आम्ही वर्षानुवर्ष पाहतोय. ज्या कारणासाठी ते पळाले ते आता सर्वांना दिसत आहे. पालकमंत्री नेहमी कोणत्या ना कोणत्या जिल्ह्याचा मालक होणार एवढीचं भांडण करत आहेत. पालकमंत्री रस्त्यावर दिसायला पाहिजे. परंतू त्यांचे कोणाला कोणते बंगले मिळतील?, नवीन गाड्या का नाही आले. याकडे लक्ष देत आहेत."