ताज्या बातम्या

क्रूरतेचा कहर; मुंबईत एका व्यक्तीने लिव्ह इन पार्टनरसोबत असे काही केलं की तुम्ही विचार देखील करू शकत नाही

मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मुंबई : मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका ५६ वर्षीय व्यक्तीने आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, महिलेची हत्या केल्यानंतर आरोपींनी तिच्या शरीराचे अनेक तुकडे केले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

मनोज साहनी असे संशयिताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. तो गेल्या तीन वर्षांपासून मीरा रोड परिसरातील आकाशगंगा इमारतीत भाड्याच्या फ्लॅटमध्ये सरस्वती वैद्य नावाच्या महिलेसोबत राहत होता. बुधवारी इमारतीतील रहिवाशांनी फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती नयानगर पोलिसांना दिली.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात या महिलेची अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. डीसीपी मुंबई जयंत बजबळे म्हणाले, 'पोलिसांना मीरा रोड परिसरात एका महिलेचा मृतदेह सापडला. मृतदेहांचे अनेक तुकडे झाले होते. येथे एक जोडपे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. प्राथमिक तपासात महिलेला मारहाण केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा