Suicide News Team Lokshahi
ताज्या बातम्या

'जगण्यासाठी पैसे नाही आनंद लागतो' म्हणत महिलेनं मुलीसह केली आत्महत्या

आत्महत्या करण्यापूर्वी या महिलेने आपल्या पती आणि सासुला केलेला मेसेज मन हेलावून टाकणारा आहे.

Published by : Sudhir Kakde

औरंगाबाद | सचिन बडे : वैवाहिक आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणींमुळे होणाऱ्या आत्महत्यांचं (Suicide Case) प्रमाण दिवसेंदिवस वाढत जात आहे. यामध्ये सासरच्या जाचाला कंटाळून होणाऱ्या आत्महत्या देखील तेवढ्याच प्रमाणात आहेत. अशातच औरंगाबादेत (Aurangabad) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. वैवाहिक आयुष्यातील काही अडचणींना कंटाळलेल्या एका महिलेनं चिमुरडीसह रेल्वेतून उडी घेतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. भावाला आणि पतीला व्हाट्सअप मेसेज करून रेल्वेतून उडी मारून महिलेने 3 वर्षाच्या चिमुरडीसह या महिलेने आत्महत्या केली.

सासरच्या जाचाला ही महिला अत्यंत कंटाळली होती. लग्न झाल्यापासून वारंवार होणारी भांडणं आणि त्यानंतर निर्माण होणारा तणाव यामुळे पीडित महिला कंटाळली होती. त्यामुळे या महिलेने अखेर आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. यावेळी या महिलेने आपल्या पतीला टाकलेला मेसेज मन हेलावून टाकणारा होता. "जगण्यासाठी पैसा लागत नाही, तर आनंद लागतो" असा व्हाट्सअप मेसेज या महिलेने आपल्या पतीला केला.

तसंच सासुबाई दुसऱ्यांच्या मुलींना फसवू नका आणि मुलाला आतातरी मांडीवरून उतरवा असा मेसेजही आत्महत्यापूर्वी केलेवा आहे. पुनम विसपुते असे या महिलेचे नाव असून, शांभवी असं 3 वर्षीय चिमुकलीचं नाव आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Monorail : मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार; MMRDAने घेतला महत्त्वाचा निर्णय

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय