Admin
ताज्या बातम्या

ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून मारहाण

ठाण्यात शिंदे गटाच्या महिल्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला कार्यकर्त्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

ठाण्यात शिंदे गटाच्या महिल्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या एका महिला कार्यकर्त्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. फेसबुक पोस्ट टाकल्याने ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे या महिला युवतीला शिवसेना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केलेली आहे. धक्कादायक म्हणजे ही महिला सहा महिन्याची गर्भवती असल्याची माहिती ठाकरे गटाच्या महिला युवती यांनी दिली आहे. महिलेला जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. या प्रकरणी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.

त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, कामावर सुटण्याची वेळ झाली असताना सायंकाळी शिंदे गटाच्या पूजा तिडके, माजी नगरसेविका नम्रता भोसले, प्रियांका मसुरकर, प्रतिक्षा विचारे, हर्षाली शिंदे, रोहिणी ठाकूर, अनघा पवार, सिद्धार्थ ओवळेकर व इतर 15 महिला अशा एकत्रित ऑफिसमध्ये घुसून मला शिवीगाळ करत मारहाण केली. असे त्यांनी या तक्रारीत म्हटले आहे.

तसेच पक्षाचे प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शिंदे गटाचे दत्ताराम गवस यांनी अक्षेपार्ह पोस्ट केली होती त्याला प्रत्युत्तर म्हणून मी माझे मत त्या ठिकाणी मांडले होते. मी माझ्या कमेंटमध्ये कुठेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पत्नीचा उल्लेख केला नसतानाही मला वारंवार धमकीचे कॉल येऊ लागले होते. याप्रकरणी सखोल चौकशी करून तत्काळ हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करा. अशी त्यांनी मागणी केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची आज पत्रकार परिषद

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार