संजय राठोड| यवतमाळ : मागील भाजप सरकार काळात यवतमाळ येथे स्त्री व बाल रूग्ण्यालयाकरीता ३९ कोटी रुपये मंजुर करण्यात आले होते. सदर रुग्णालयाचे प्रशस्त इमारत बनवून देखील तयार झाले आहे. यवतमाळ शहराच्या आरोग्य सुविधेत भर घालणाऱ्या या रुग्णालयाला लवकरात लवकर रुग्णालय स्टाफ व सर्व आवश्यक यंत्र सामग्री तात्काळ उपलब्ध करून करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
स्त्री व बाल रुग्णालय संपूर्ण क्षमतेने सुरू करण्याकरीता आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या दालनात मंत्रालयाच्या आरोग्य विभागाची वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आमदार मदन येरावार यांनी घेतली. स्त्री व शिशू रुग्णालयासंबंधीत प्रलंबित सर्व प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे आदेश देण्यात आले. सदर रुग्णालय काही महिन्यातच पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे, अशी माहिती आमदार मदन येरावार यांनी दिली.