दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु होते. यावेळी अनेक राजकीय नेत्यांनीही हजेरी लावली होती. यावेळी नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंबद्दल एक धक्कादायक वक्तव्य केले. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज दिल्यानंतरच एक पद मिळतं. असे खळबळजनक विधान नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे.
यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. नीलम गोह्रे यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेतील महिला आघाडी आता आक्रमक झाली आहे. महिला आघाडीच्या संघटक रंजना नेवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली महिला पदाधिकाऱ्यांची 12 वाजता बैठक होणार आहे. त्याचसोबत ठाकरेंची शिवसेना काय निर्णय घेते हे पाहण महत्त्वाच ठरणार आहे.