ताज्या बातम्या

कल्याणमधील देशमुख होमचा पाणी प्रश्न पेटणार!

Published by : Team Lokshahi

अमझद खान | कल्याण : नागरीकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. वारंवार विनवणी करुन केडीएमसी आणि एमआयडीसी लक्ष देत नाही. अखेर महिलांनी कल्याण शीळ रस्त्यावर टाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी समजूत काढत काही नागरीकांना रस्त्यावरुन हटवित काही नागरीकांना ताब्यात घेतले आहे. असे राहिले तर देशमुख होम्समधील पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आहे. लवकरच पाणी प्रश्न सुटला नाही तर हजारो नागरीक रस्त्यावरुन उतरुन आंदोलन करणार नंतर जेलमधअये आम्हाला पाणी पाजण्याची वेळ येईल असा इशारा माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी दिला आहे.

कल्याण पूर्व भागातील देशमुख होम या कॉम्पलेक्समध्ये 19 इमारतीत 13क्क् सदनिका धारक आहे. 2016 पासून या देशमुख होममध्ये पाण्याची समस्या आहे. स्थानिक नागरीक सातत्याने या प्रश्नावर पाठपुरावा करीत आहेत. काही दिवसापूर्वी भर पावसात महिलांनी आंदोलन केले होते. एमआयडीसी अधिका:यांसोबत चर्चा देखील झाली होती मात्र त्यातून काही तोडगा निघाला नव्हता. प्रश्न तसाच राहिला. या आंदोलनात संतप्त नागरीक ज्यामध्ये महिलांची संख्या जास्त होती. महिला रस्त्यावर उतरल्या. या आंदोलनात माजी नगरसेवक कुणाल पाटील हे देखील सहभागी झाले. काही महिला लहान मुलांनासोबत घेऊन आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. महिलांना पाणी टंचाईचा इतका त्रस होत आहे की काही महिला रडत होत्या. कल्याण शीळ रस्त्यावर रास्ता रोकोची माहिती मानपाडा पोलिसांना मिळतात. पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणी ताततीने धाव घेतली. रास्ता रोको करण्यापासून पोलिसांनी नागरीकांना रोखण्याचा प्रयत्न केला.

यावेळी माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी सांगितले, आमदार, खासदार आणि अधिका:यांना या प्रकरणी सांगून देखील त्यांच्याकडून काही एक कारवाई केली जात नाही. हा प्रश्न सोडविला जात नाही. केडीएमसीचे लक्ष दिले पाहिजे. ठाणो जिल्ह्याचे मुख्यमंत्री झालेले आहे. त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे. नागरीक रडताहेत. आंदोलन केल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाते. या प्रश्नावर तोडगा निघाला नाही तर पुन्हा सहा हजार लोक रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील असा इशारा पाटील यांनी दिला आहे. जेलमध्ये गेलो तरी चालेल. जेलमध्ये जाऊन पाणी पाजण्याची वेळ आली तरी चालेल.

Sanjay Raut: 'नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा' राऊतांचा आरोप

रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी एकनाथ खडसे मैदानात

Nashik Crime: नाशिकमध्ये ICICI होम फायनान्समध्ये मोठी घरफोडी

Girgaon Linkedin Post Viral: गिरगावात जॉबसाठी आक्षेपार्ह जाहिरातीमुळे संताप; मराठी माणसालाच केली बंदी

आमदार रोहित पवार यांचा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल; म्हणाले...