Admin
ताज्या बातम्या

Women's Day : महिला दिनाच्या निमित्ताने राज ठाकरेंनी दिली महिलांना एक मोठी 'ऑफर'; म्हणाले...

'जागतिक महिला दिन' हा दिवस जागतिक स्तरावर दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो.

Published by : Siddhi Naringrekar

'जागतिक महिला दिन' हा दिवस जागतिक स्तरावर दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राज ठाकरेंनी सोशल मिडियाच्या माध्यमातून एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. राज ठाकरे या पोस्टमध्ये म्हणाले की, सगळ्या चौकटी मोडून आज सर्वच क्षेत्रामंध्ये स्त्रियांची जी घौडदौड सुरु आहे, ती थक्क करणारी आहे. आज ग्रामीण भागातील असो की शहरी भागातील, इथल्या मुलींना उच्च शिक्षणाची, स्वतःच करिअर घडवायची प्रचंड ओढ आहे. आणि त्यासाठी त्या घरापासून लांब इतर शहरांत किंवा परदेशांत नोकरी, शिक्षणाच्या निमित्तानं सहज स्थिरावत आहेत. जिथं जातील तिथं स्वतःचा ठसा उमटवत आहेत. हे चित्र आनंददायी आहे. असे राज ठाकरे म्हणाले.

तसेच पुढे त्यांनी लिहिले की, १००,१५० वर्षांपूर्वी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून प्रचंड संघर्ष करावा लागत होता अशी परिस्थिती होती. आणि त्याच समाजात मोठमोठ्या उद्योगसमूहांच्या व्यवस्थापनापासून ते जागतिक अर्थकारणात उलाढाली करणाऱ्या संस्थांमध्ये मोठ्या पदांवर स्त्रिया कार्यरत आहेत. इतकंच काय देशाची अर्थव्यवस्था, परराष्ट्र व्यवहार, सीमांचं संरक्षण ते थेट राष्ट्रपतीपदी स्त्रिया आपला ठसा उमटवत आहेत. आणि हे सर्व त्यांनी निव्वळ स्वकर्तृत्वावर कमावलं आहे.

म्हणूनच आता स्त्रियांनी आता राजकारणात देखील मोठ्या प्रमाणावर यायला हवं. 'जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं' हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ध्येय आहे, आणि हे साध्य करायचं असेल तर स्त्रियांचा सहभाग देखील तितकाच महत्वाचा आहे, ह्याची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच विविध क्षेत्रांत स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांनी राजकारणात यावं, त्यांना संधी देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्सुक आहे. पुन्हा एकदा सर्व महिलांना, जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. असे म्हणत राज ठाकरे यांनी महिलाना राजकारणात येण्याची ऑफर दिली आहे. तसेच सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा