Diella : ऐकावं ते नव्वलचं! चक्क Ai मंत्री देणार 83 बाळांना जन्म; नेमकं प्रकरण काय? Diella : ऐकावं ते नव्वलचं! चक्क Ai मंत्री देणार 83 बाळांना जन्म; नेमकं प्रकरण काय?
ताज्या बातम्या

Diella : ऐकावं ते नव्वलचं! चक्क Ai मंत्री देणार 83 बाळांना जन्म; नेमकं प्रकरण काय?

अल्बेनियाच्या पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात कार्यरत जगातील पहिली एआय मंत्री डिएला पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान एडी रामा यांनी डिएला “गर्भवती” असल्याचं सांगितल्याने जगभरात आश्चर्य व्यक्त करण्यात आलं.

Published by : Riddhi Vanne

अल्बेनियाच्या पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात कार्यरत जगातील पहिली एआय मंत्री डिएला पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान एडी रामा यांनी डिएला “गर्भवती” असल्याचं सांगितल्याने जगभरात आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. त्यांनी म्हटलं होतं की डिएला 83 मुलांना जन्म देणार आहे.

या वक्तव्यामागचं सत्य आता समोर आलं आहे. प्रत्यक्षात ही “गरोदरपणाची” गोष्ट प्रतीकात्मक आहे. अल्बेनियन सरकार आपल्या 83 खासदारांसाठी स्वतंत्र एआय सहाय्यक (AI assistants तयार करत आहे. या सहाय्यकांनाच पंतप्रधानांनी विनोदी अंदाजात डिएलाची “मुलं” म्हटलं आहे.

पंतप्रधान रमांनी स्पष्ट केलं की ही एआय सहाय्यक प्रणाली खासदारांना त्यांच्या संसदीय कामकाजात मदत करेल. खासदार अनुपस्थित असतील तर त्यांना अधिवेशनात परत बोलावणं, चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे सांगणं आणि उत्तरं तयार करण्यात मदत करणं अशी या एआय सहाय्यकांची भूमिका असेल.

रमांच्या म्हणण्यानुसार, 2026 पर्यंत ही नवी प्रणाली संसदेत लागू करण्याची योजना आहे म्हणजेच डिएलाची “83मुलं” म्हणजे अल्बेनियन संसदेसाठी विकसित होणारे अत्याधुनिक एआय सहाय्यक आहेत, मानव नव्हे, तर डिजिटल सहकारी!

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा