Rohit Sharma and Harminpreet Kaur awarded Padma Shri : केंद्र सरकारने 2026 सालासाठी देशातील मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यंदा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 131 मान्यवरांना हा सन्मान दिला जाणार आहे. यामध्ये पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तिन्ही श्रेणींचा समावेश आहे. कला, क्रीडा, साहित्य, चित्रपट आणि समाजसेवा क्षेत्रातील व्यक्तींना यंदा गौरवण्यात आले आहे.
क्रीडा क्षेत्रासाठी ही घोषणा खास ठरली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि महिला संघाची नेत्या हरमनप्रीत कौर यांना पद्मश्री पुरस्कार मिळणार आहे. रोहितच्या नेतृत्वात भारताने मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळवले, तर हरमनप्रीतने महिला क्रिकेटला नवी दिशा दिली.
या वर्षी पाच जणांना पद्मविभूषण, तेरा जणांना पद्मभूषण आणि 113 जणांना पद्मश्री देण्यात येणार आहे. क्रीडा क्षेत्रातूनही अनेक खेळाडूंचा सन्मान करण्यात आला आहे. टेनिसपटू विजय अमृतराज यांना पद्मभूषण, तर हॉकी, कुस्ती, पॅरा-ॲथलेटिक्स आणि पारंपरिक खेळांतील खेळाडूंना पद्मश्री जाहीर झाली आहे. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात या मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. देशासाठी दिलेल्या योगदानाची ही एक सन्मानाची पावती मानली जात आहे.
या खेळाडूंना पद्मश्री पुरस्कार मिळाला
विजय अमृतराज (टेनिस) – पद्मभूषण
रोहित शर्मा (क्रिकेट) – पद्मश्री
हरमनप्रीत कौर (क्रिकेट) – पद्मश्री
प्रवीण कुमार (पॅरा-ॲथलेटिक्स) – पद्मश्री
बलदेव सिंग (हॉकी)- पद्मश्री
भगवानदास रायकवार (पारंपारिक मार्शल आर्ट्स) – पद्मश्री
के. पंजनिवेल (सिलंबम)- पद्मश्री
सविता पुनिया (हॉकी) – पद्मश्री
व्लादिमीर मेस्तविरिशविली (मरणोत्तर) – पद्मश्री (कुस्ती
थोडक्यात
केंद्र सरकारने २०२६ साली देशातील पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे.
यंदा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या १३१ मान्यवरांना हा सन्मान दिला जाणार आहे.
पुरस्कार पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तिन्ही श्रेणींमध्ये दिले जातील.
कला, क्रीडा, साहित्य, चित्रपट आणि समाजसेवा क्षेत्रातील व्यक्तींना यंदा गौरवण्यात आले आहे.
हा पुरस्कार देशभरातील उत्कृष्ट योगदानाची ओळख म्हणून दिला जातो.