ताज्या बातम्या

'लिटील-लिटील' हे सूत्र सुरक्षित नाही; WHO चा गंभीर इशारा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : तुम्ही दारू पिण्याचे शौकीन असेल तर सावधान, कारण जागतिक आरोग्य संघटना (WHO) आपल्या अभ्यासात धक्कादायक दावा केला आहे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की अल्कोहोलचा पहिला थेंब प्यायल्यानंतरच कर्करोगाचा धोका सुरू होतो. तसेच दारू पिण्याचे कोणतेही प्रमाण नाही, त्यामुळे एवढ्या प्रमाणात दारू पिणे आरोग्यासाठी हानिकारकच आहे, असे गृहीत धरता येईल, असेही सांगितले.

डब्लूएचओने अभ्यासात असे म्हटले आहे की अल्कोहोलचे सेवन केल्याने कमीतकमी 7 प्रकारच्या कर्करोगाचा धोका लक्षणीय वाढतो. यामध्ये तोंडाचा कर्करोग, घशाचा कर्करोग, यकृताचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, आतड्याचा कर्करोग यांचा समावेश होतो. वास्तविक, अल्कोहोल हे सामान्य पेय नाही, उलट ते शरीराला खूप हानी पोहोचवते. दारू हा तसा विषारी पदार्थ आहे. दशकांपूर्वी इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने हे गट 1 कार्सिनोजेन म्हणून वर्गीकृत केले होते. हे सर्वात धोकादायक आहे. यामध्ये एस्बेस्टोस आणि तंबाखूचा देखील समावेश आहे.

अल्कोहोल जैविक यंत्रणेद्वारे कर्करोगास कारणीभूत ठरते. याचा अर्थ स्पष्ट आहे की दारू कितीही महाग असली किंवा कमी प्रमाणात वापरली तरी त्यामुळे कर्करोगाचा धोका निर्माण होतो. जास्त प्रमाणात मद्य सेवन केल्याने कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो, असा दावा डब्ल्यूएचओने आपल्या अभ्यासात केला आहे.

Daily Horoscope 4 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचे वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 4 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

'आमचं सरकार आलं तर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवू' राहुल गांधींची मोठी घोषणा

Garlic: उन्हाळ्यात 'या' लोकांनी लसूण खाणे टाळावे

Cold Water: माठातील पाणी फ्रिजसारखं गार कसं करायचं? जाणून घ्या...