ताज्या बातम्या

Israel-Palestine Conflict: इस्रायल हमासमध्ये महायुद्ध; दोन दिवसांत 1000 जणांनी गमावले प्राण

इस्रायल आणि पॅलेस्टिनीमधील संघर्ष अधिक तीव्र झाला असून या संघर्षातील मृतांचा आकडा 1000 पार पोहोचला आहे.

Published by : Team Lokshahi

इस्रायलवर हमासनं शनिवारी हल्ल्याला सुरूवात केली आहे. इस्रायलमधील मृतांची संख्या 400 पेक्षा अधिक झाली आहे. हमासनं हल्ला सुरू केल्यापासून आतापर्यंत मारल्या गेलेल्या इस्रायलींचीसंख्या वाढतेय. इस्रायल आणि पॅलेस्टिनीमधील संघर्ष अधिक तीव्र झाला असून या संघर्षातील मृतांचा आकडा 1000 पार पोहोचला आहे. शनिवारी हमासने इस्रायलच्या विविध शहरांमध्ये 5000 हून अधिक क्षेपणास्रांचा मारा केला. यानंतर अवघ्या दोन दिवसांत या संघर्षाचा भडका उडाला असून यामुळे हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

हमासच्या हल्ल्यात आतापर्यंत 2000 हून अधिक इस्रायली नागरिक जखमी झाले आहेत. याशिवाय 100 जणांचे अपहरण करण्यात आलं आहे. दुसरीकडे, इस्रायली लष्कराच्या हल्ल्यात पॅलेस्टाईनमधील 370 लोक ठार झाले असून 2200 हून अधिक जखमी झाले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा