नाशिकमधील कुंभमेळ्याच्या (Kumbhmela) पार्श्वभूमीवर तपोवन परिसरातील साधुग्रामच्या जागेत सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधात वृक्षप्रेमी (Tree) आणि राजकीय पक्षातील नेत्यांनीही आक्रमक भूमिका घेत विरोध केला आहे. नाशिकमधील तपोवन परिसरातील साधुग्रामच्या जागेत सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमी व वृक्षप्रेमींचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चालले असतानाच आता पर्यावरणप्रेमी, वृक्षमित्र आणि अभिनेता सयाजी शिंदे यांनीही रोखठोक भूमिका मांडली. झाडे ज्यांच्यासाठी तोडली जात आहेत, साधू-संतांना त्या तरी झाडं तोडलेलं पटेल का? सयाजी शिंदेंनी (Sajayi shinde)असा सवाल विचारला आहे.
राजकीय नेते, सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटीही सोशल मीडियावरून तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर याबाबत आवाज उठवत आहेत. तपोवनातल्या 1800 झाडांची कत्तल प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेकडूनही जाहीर निषेध करणार आहे. विशेष म्हणजे हा निषेध नोंदविण्या साठी सर्व कलाकार सहभागी होणार असून, वृक्षप्रेमी-नाशिककर तुम्ही देखील सहभागी व्हा असे आवाहन मनसेकडून करण्यात आले आहे. तपोवनातील कमानीजवळ संभाजीनगर रोड येथे शनिवारी 6 डिसेंबर ला सकाळी हा निषेध नोंदविण्यात येणार आहे. तत्पूर्वी आज पत्रकार परिषद घेत सजायी शिंदे यांनी आपली भूमिका मांडली.
साधू-महंतांसाठी 1,150 एकरांवर भव्य साधूग्राम तपोवन परिसरात उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जवळपास 1,800 झाडे तोडली जात आहेत. त्यावरु, वृक्षप्रेमी, पर्यावरण प्रेमी आक्रमक झाले असून अभिनेता सयाजी शिंदेंनी या वृक्षतोडीला तीव्र विरोध केला. तसेच, ''साधू आले गेले काही फरक पडत नाही'' असेही त्यांनी म्हटले होते. आज त्याच अनुषंगाने पत्रकार परिषद घेत सजाजी शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 10 वर्षांच्या आतली झाडं तोडायची आणि त्या बदल्यात दुसरी झाडं लावायचीही कल्पनाच चुकीची आहे. म्हणजे, पोरांना मारायचं आणि आई-बापाला जिवंत ठेवायचं, मूळात त्याचं उरलेलं वय किती आहे. त्यामुळे, झाडं तोडून दुसरीकडे कुठतरी 10 झाडं लावायची ही कल्पनाच चुकीची आहे. झाडं हे आपली आई-बाप आहेत. आपण जगतो ते केवळ झाडांमुळे जगतो. आपल्या आई-बापांवर कोणी हल्ला करत असेल तर तुम्ही गप्प बसणार आहोत का? महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला माझा सवाल आहे, असेही सयाजी शिंदे यांनी म्हटले.
झाडं तोडणं हे साधु-संतांना पटेल का? - शिंदे
कुठल्याही साधु संतांचा आपण कसा अपमान करू, मुळात झाडं तोडणं हे साधु संताना पटेल का? असा सवाल सयाजी शिंदे यांनी उपस्थित केला. ऋषी-मुनी झाडाखालीच तपश्चर्या करत होते, असेही त्यांनी सांगितले. पर्यावरणवाद्यांवर दरम्यान, मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात प्रश्न विचारला असता, मला त्याच्यावर उत्तर द्यायचं नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दहा वर्षे झालेली झाडं मोडायची आणि त्या बदल्यात दुसरी 10 झाडं लावणं ही कल्पनाच चुकीची आहे. झाडं महत्वाची आहेत आणि ती जगली पाहिजे हेही महत्वाचं आहे