ताज्या बातम्या

Yashomati Thakur : आता जे काही सरकार आलेलं आहे, ते द्वेषानं आमच्याकडे बघतं

सभागृहामध्ये प्रश्न उत्तराचा तास सुरू असताना काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी आक्रमक होत सभागृहात मला बोलू देत नसल्याचा आरोप करत यशोमती ठाकूर रडल्या होत्या.

Published by : Siddhi Naringrekar

सभागृहामध्ये प्रश्न उत्तराचा तास सुरू असताना काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी आक्रमक होत सभागृहात मला बोलू देत नसल्याचा आरोप करत यशोमती ठाकूर रडल्या होत्या. यावर आता यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, सभागृहामध्ये जे कोणी सदस्य त्या ठिकाणी येतात. त्यांना त्यांच्या मतदारसंघामधलं, महाराष्ट्रामधलं विषय मांडायचे असतात. सभागृहामध्ये प्रश्न- उत्तरांचा विषय असतो. त्यामध्ये आम्ही आमचे प्रश्न मांडायचा प्रयत्न करत होतो.

एवढे वर्ष झालं आम्ही ही सभागृहामध्ये आहे. कधी या प्रकारची वागणूक कुणी दिली नाही. माझ्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना त्यांनी बोलू दिलं. मलाच मात्र ते बोलायला मनाई करत होते. आता त्यांची काय खुन्नस आहे, त्यांना कोणी काय सांगितले आहे माहित नाही. एकिकडे तुम्ही लाडकी बहिण, लाडकी बहिण बोलता आणि दुसरीकडे सभागृहामध्ये असणाऱ्या ज्या महिलाभगिनी आहेत त्यांना बोलण्यासाठी संधी देत नाहीत.

यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, माझ्यासारख्या व्यक्तीला त्याठिकाणी प्रश्न मांडू देत नाहीत म्हणून माझी चिडचिड झाली आणि मला गहिवरुन आलं. तर बाकी महिलांचे काय होत असेल, मी तर आक्रमक आहे. ही पद्धत नाही ना. आम्ही ही 2009मध्ये काँग्रेसचं सरकार होते. त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होते. सगळं काही खेळीमेळीनं जुळून यायचं. मागच्या वेळेला पण भाजपचे सरकार होते. तरी या प्रकारची खुन्नस कोणी केली नाही. पण आता जे काही सरकार आलेलं आहे. ते बिलकुल द्वेषानं आमच्याकडे बघतं. आमचं विषय असो, आम्ही दिलेलं पत्र असो त्या ठिकाणी काम करायची नाहीत. असे ते लोक ठरवतात. असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा