ताज्या बातम्या

नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांचे बॅनर फाडले; यशोमती ठाकूर म्हणाल्या...

अमरावतीत नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांचे बॅनर फाडण्यात आल्याची घटना घडली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अमरावतीत नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांचे बॅनर फाडण्यात आल्याची घटना घडली आहे. मोदींच्या शपथविधीनंतरच्या जल्लोषात अभिनंदननाचे बॅनर फाडले असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर भाजप कार्यकर्ते आणि मविआचे कार्यकर्ते आमने सामने आले. रात्री उशिरा भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता यशोमती ठाकूर यांनी पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, जनता या उन्मादाला खाली उतरवल्याशिवाय राहणार नाही. मोदींच्या शपथविधीचा जल्लोष साजरा करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित खासदार बळवंत भाऊ वानखडे यांचे पोस्टर फाडले. एक मागासवर्गीय कार्यकर्ता खासदार झाल्यामुळे भाजपच्या संपूर्ण इकोसिस्टिमच्या पोटात दुखू लागलंय.

यासोबतच त्या म्हणाल्या की, हा उन्माद योग्य नाही, उन्माद दाखवला म्हणून महाराष्ट्रात गाशा गुंडाळावा लागला, जनतेच्या खासदाराला केवळ मागासवर्गीय आहे म्हणून ही वागणूक देणार असाल तर मतपेटीतून आणखी कडक उत्तर दिलं जाईल. तत्पुर्वी अमरावतीमध्ये वारंवार अशांतता पसरवण्याचा प्रयत्न होत आहे याची दखल गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे. कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना पाठीशी घालाल तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू. असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा