सुरज दाहाट|अमरावती: अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज उपसा सिंचन योजना प्रकल्पात झालेली लाखो रुपयांच्या विद्यूत साहित्याची चोरी हा सर्वस्वी सरकारी अनास्थेचा भोंगळ कारभार आहे. सरकारने शेतकरी आणि सरकारी यंत्रणेवर दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळविल्याचा आरोप करत अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील उपसा सिंचन प्रकल्प ठिकाणी माजी मंत्री व आमदार यशवंत ठाकूर यांनी कार्यकर्त्यासह ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
या ठिकाणी काही दिवसांपूर्वी विद्युत रोहित्र ट्रान्सफॉर्मर चोरी गेल्याने नव्याने विद्युत रोहित्र ट्रान्सफॉर्मर चोरी गेल्याने बसवण्याच्या मागणीसाठी सिंचन प्रकल्पा यशोमती ठाकूर यांनी कार्यकर्त्यासह आंदोलन सुरू केले आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी ठाकूर यांनी केली आहे.तिवसा जलसंपदा विभागांतर्गत अमरावती- नागपूर महामार्गालगत अप्पर वर्धाच्या मुख्य कालव्याच्या बाजूला गुरुकुंज उपसा सिंचन योजना प्रकल्पाच्या वॉटर लिफ्टिंगकरिता असणारी स्वतंत्र विद्युत पुरवठा यंत्रणा फोडून लाखोंचे साहित्य अज्ञात चोरट्याने लंपास केले.
रात्रपाळीत चौकीदार नसल्याची संधी अज्ञात चोरट्यांनी साधली. खरिपातील कपाशी व तूर या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांनी ४०० हेक्टर क्षेत्रासाठी पाण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने तयारी सुरु असतानाच अचानक चोरट्यांनी रोहित फोडले. त्यामुळे खरीप हंगामातील शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही. दुसरीकडे, रब्बी हंगामातील शेकडो हेक्टर क्षेत्र उपसा सिंचन होत नसल्याने शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे, जोपर्यंत या ठिकाणी काम सुरू होत नाही तोपर्यंत आपण हटणार नसल्याचा पवित्रा ठाकूर यांनी घेतला आहे