ताज्या बातम्या

Yavatmal Crime News : आधी विष दिलं, मग जंगलात नेऊन पेटवलं; पत्नीनंच काढला तीन विद्यार्थ्यांच्या मदतीनं पतीचा काटा

दारूचे व्यसन असलेल्या शिक्षक पतीला विष देऊन या महिलेने संपवले.

Published by : Rashmi Mane

यवतमाळ येथे एका मुख्याध्यापिकेने शिक्षक पतीचा जीव घेतल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. दारूचे व्यसन असलेल्या शिक्षक पतीला विष देऊन या महिलेने संपवले. तर शिकवणीसाठी येणाऱ्या इयत्ता नववीतील तीन विद्यार्थ्यांच्या मदतीनं जंगलात नेऊन पतीचा मृतदेह पेटवून दिला. मंगळवार, २० मे रोजी ही घटना घडली असून या प्रकरणी लोहारा पोलिसांनी मुख्याध्यापिका निधी शंतनू देशमुख (वय 23) हिला अटक केली आहे. तर तीन विद्यार्थ्यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

यवतमाळ येथील दारव्हा रस्त्यावरील सनराईज इग्लिश मीडियम स्कूलमध्ये शंतनू अरविंद देशमुख तात्पुरत्या स्तरावर शिक्षक म्हणून कार्यरत होते. तर या शाळेत त्यांची पत्नी निधी ही मुख्याध्यापिका आहे. शंतनू आणि निधी यांचा दोन वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला होता. मात्र लग्नाच्या काही दिवसांनंतर शंतनूला दारूचं व्यसन जडलं आणि त्यातून दोघांमध्ये वाद होऊ लागले.

पतीच्या दारूच्या व्यसनाला कंटाळलेली निधी त्याच्यापासून सुटका मिळवण्याचा विचार करून लागली. दरम्यान, १३ मे रोजी तिनं रात्री पतीला विष देऊन त्याचा जीव घेतला. त्याचा मृतदेह तिनं रात्रभर घरातच ठेवला. दुसऱ्या दिवशी शाळेत गेली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शिकवणीसाठी घरी येणाऱ्या इयत्ता नववीतील तीन विद्यार्थ्यांची मदत घेण्याचे ठरविले. त्या विद्यार्थ्यांना विश्वासात घेत रात्री विद्यार्थ्यांच्या मदतीने शंतनूचा मृतदेह चौसाळाच्या जंगलात घेऊन गेली. मृतदेहाची ओळख पटून नये यासाठी पेट्रोल टाकून पतीचा मृतदेह पेटवला.

पोलिसांना जंगलात अर्धवट जळालेला मृतदेह सापडल्यानं एकच खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सुपूर्द केला. त्यांच्या तपासात शंतनू काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शंतनूच्या मित्रांना मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी बोलविले. मृतदेह शंतनूचा असल्याचे सांगितले स्पष्ट होताच निधीला चौकशीसाठी बोलविले. पोलिसांनी सखोल चौकशी करताच एक एक धागा उलगडत गेला आणि निधीनंच हे कृत्य केल्याच उघड झालं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा