Yogesh Kadam Car Accident 
ताज्या बातम्या

Yogesh Kadam Car Accident : आमदार योगेश कदम यांच्या गाडीला कशेडी घाटात अपघात

आमदार योगेश कदम यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

Published by : Pankaj Prabhakar Rane

रायगड : भारत गोरेगावकर | आमदार योगेश कदम (Yogesh Kadam Accident) यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रात्री सव्वादहाच्या सुमारास पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे आमदार योगेश कदम यांच्या गाडीचा (Yogesh Kadam Car Accident) रायगड हद्दीत अपघात झाला आहे. त्यामुळे आता राज्यातील नेत्यांच्या वाहनांचा अपघात होण्याचं सत्र सुरूच असल्याचं पहायला मिळतंय.

सुदैवाने आमदार योगेश कदम अपघातानंतर सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या चालकाला (Driver) मात्र किरकोळ दुखापत झालीये. अपघातानंतर चोळई येथील शासकीय रूग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.अपघातात आमदार कदम यांच्या चालकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी मिळाली आहे. भरधाव वेगातील टँकरने आमदार कदम यांच्या गाडीला धडक दिली. मुंबईकडे येत असताना अपघात झाला. अपघातानंतर टँकर पलटी झाला आणि चालक पळून गेला. आमदार कदम यांच्या गाडीला धडक बसल्यानंतर टँकर पोलिसांच्या गाडीला धडकला.

दरम्यान, टँकर गाडीला धडकल्याने पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. आमदार कदम यांच्या गाडीचे मागच्या बाजूचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मागील काही दिवसांपासून राज्यातील नेत्यांच्या गाडीच्या अपघाताची मालिका सुरू असल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणं टाळा, अशी विनंती करण्यात येत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pigeon Feeding : नियंत्रित पद्धतीने कबुतरांना खाद्य देण्यासाठी तीन संस्थांनाचे अर्ज

Latest Marathi News Update live : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर 2 विशेष गाड्या धावणार; प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Accident : मुंबईच्या शिवडी येथे शाळेच्या बसचा अपघात; 4 मुलं जखमी

GST मध्ये मोठे बदल ; आता 5 टक्के आणि 18 टक्के असे दोन टप्पे