Kalyan News  team lokshahi
ताज्या बातम्या

इतर पक्षाच्या लोकांसोबत का फिरतो, म्हणतं तरुणाला बेदम मारहाण

तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Published by : Shubham Tate

Kalyan News : इतर पक्षातील लोकांसोबत का फिरतो ? या कारणावरुन काही तरुणांनी आकाश भोसले नावाच्या तरुणाला बेदम मारहाण केल्याची कल्याणमध्ये घटना घडली आहे. खडकपाडा पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (The young man was brutally beaten up saying why he was hanging out with other party people)

कल्याण पश्चिमेतील मोहननजीक आरएस जेतवननगर परिसरात राहणारा आकाश भोसले हा तरुण काल रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास रस्त्याने चालत जात असताना, त्याचा मित्र त्याला भेटला. त्याच्यासोबत बोलत असताना आकाशच्या आईचा फोन आला. फोनवरुन आईसोबत बोलत असताना आकाशला मारहाण करण्यास सुरुवात केली.

लोखंडी रॉडने आकाशला बेदम मारहाण केली. या घटनेत त्याच्या पायाला आणि हाताला जबर दुखापत झाली आहे. आकाश भोसले यांचा आरोप आहे की, मारणारे चौघे कुणाल रातांबे, सुनिल जाधव, ओंकार करके आणि विश्वनाथ जाधव हे होते. हे चारही जण आरपीआय पक्षाचे काम करतात. त्यांनी मला विचारले तू इतर पक्षाच्या लोकांसोबत का फिरतो अशी विचारणा करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यात मी जखमी झालो.

या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी आकाश भोसले याच्या कुटुंबियांनी केली आहे. कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. हा हल्ला कोणाच्या सांगण्यावरून झाला आहे का? याचा तपास देखील केला पाहिजे अशी मागणी जखमी आकाशच्या कुटुंबाची आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा