शरीराला रिलॅक्स वाटावं म्हणून मसाज केला जातो. नियमित मसाज केल्याने शरीराच्या नसा मोकळ्या होतात. मात्र, हाच मसाज एका थाई गायिकेच्या जीवावर बेतला आहे. २० वर्षीय थाई पॉप गायिका पिंग चयादाचा मृत्यू झाला आहे. तिच्या मृत्यूनंतर चाहत्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे.
थाई पॉप गायिका पिंग चयादा हिचा 8 डिसेंबर, रविवारी मृत्यू झाल्याच्या बातमीनंतर तिच्या फॅन्समध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. चयादा ही मान आणि खांद्याच्या दुखण्यासाठी मसाज थेरपी घेत होती. मात्र, केवळ ३ वेळा स्थानिक मसाज पार्लरमध्ये मसाज घेतल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मसाज करताना मान मोडण्याची पद्धत आहे. या मान मोडण्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. मसाजनंतर तिला मात्र, अद्याप तिच्या मृत्यूचे खरे कारण कळण्यासाठी शवविच्छेदन आवश्यक असल्याचं तिथेल स्थानिक आरोग्य प्रमुखांनी सोमवारी सांगितलं असल्याचं वृत्त बँकॉक पोस्टने दिले आहे.
इकॉनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, चयादाने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या स्थितीविषयी चाहत्यांना माहिती दिली होती. तिने तिच्या 22,000 फॉलोअर्सना अंतिम सोशल मीडिया पोस्टमध्ये तिची बिघडलेली स्थिती तपशीलवार दिली.
काय म्हणाली छायदा?
“पहिल्यांदा जेव्हा मी मसाज केला तेव्हा माझी लक्षणे सामान्य होती. मी दुसऱ्या मसाजसाठी गेले, त्याच खोलीत तोच थेरपिस्ट, यावेळी माझी मान वळवत होते. दोन आठवड्यांनंतर, मला खूप, खूप जास्त वेदना होऊ लागल्या की मी माझ्या पाठीवर किंवा पोटावर झोपू शकत नव्हते. मी लहानपणापासून मसाज शिकत आहे. मला मालिश करायला आवडतं. मला वाटले की अशाप्रकारचं दुखणं म्हणजे मसाजचा आणखी एक साईड इफेक्ट आहे. मी पुन्हा गेले. पण या नवीन मसाजकर्त्याने मसाज केल्याने आठवडाभर सूज आणि जखम झाली होती. त्यानंतर, मी लक्षणे दूर करण्यासाठी औषध घेतले. माझ्या बोटामध्ये सणक जाणवू लागली. मसाजच्या तिसऱ्या फेरीनंतर माझा उजवी बाजू सुन्न झाल्याचे मला जाणवले. आणखी दोन आठवड्यांनंतर, मी माझा उजवा हात उचलू शकले नाही. ज्यांना खरोखर मसाज आवडतो त्यांच्यासाठी मला मिळालेला हा धडा सांगवासा वाटला. मी सावरेन. मला खूप वेदना होत आहेत. मला आता काम करायचे आहे. पण आता मी योग्य वेळेची वाट पाहत आहे.”
अनेक आठवड्यांपासून चयादाची प्रकृती खालावली होती. पहिल्या मसाजनंतर तिला सुरुवातीला जडपणा आणि सुन्नपणाचा अनुभव आला, ज्यामुळे तिला अतिरिक्त मालिश करण्यास प्रवृत्त करण्यात आल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर तिची प्रकृती आणखीनच बिघडली. अखेरीस 6 नोव्हेंबरला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. अखेरीस चयादाला सेप्टिसिमिया (रक्त विषबाधा), ज्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.