हर्षल जाधव - प्रतिनिधी : एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक गाण्यामुळे चर्चेत आलेला कुणाल कामराला लोकांची साथ मिळताना दिसतेय. कुणालने यूट्यूबवर टाकलेल्या 'Naya Bharat | A Comedy Special' या व्हिडीओला 1 कोटी 18 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला. तसेच त्या व्हिडीओखाली 83 हजार प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत.
कुणाल कामराला देशविदेशातून वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे. कायदेशीर लढ्यासाठी कुणालला जगभरातून आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला असून कोट्यवधींची रक्कम त्याच्या अकांऊटला जमा झाल्याचं समोर आलंय. भारतीयांनी 40 रुपयांपासून 10 हजारांपर्यंतची मदत कामराला पाठवली आहे. केवळ भारतच नाही तर यूएइ, कॅनडा, ब्रिटन, अमेरिकेमधूनही कुणाल कामराला मोठी मदत केली जात आहे.
कुणाल कामराला सरकारविरोधात कंटेटचा प्रचार करण्याकरता टेरर फंडिंग झाल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे राहुल कनाल यांनी केला आहे. या मदतीवर आक्षेप घेत चौकशीची मागणीही केली आहे.