Yuva Sena  Team Lokshahi
ताज्या बातम्या

मनसे आमदार राजू पाटील यांच्या टीकेवर, युवासेनेचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, स्वप्न कशाला बघता

जिल्ह्यातील मनसे काटई गाव प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आहे..

Published by : Sagar Pradhan

अमजद खान। कल्याण: शिंदेंची घराणोशाही सुरु आहे अशी टिका मनसे आमदार राजू पाटील यांनी केल्यानंतर शिंदे गटातील युवा सेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी ठाणे जिल्ह्यातील मनसे ही काटई गाव प्रायव्हेट लिमीटेड कंपनी झाली आहे. अशी टिका करीत मनसे आमदाराच्या टिकेला प्रतिउत्तर दिले आहे. इतकेच नाही तर मनसेने आमदारकीचे पाहावे. खासदारकीचे स्वप्न कशाला बघता अशीही टिका म्हात्रे यांनी केली आहे.

एका कार्यक्रमात मनसे आमदार राजू पाटील यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. ठाणो जिल्ह्याच्या पालकमंत्री या विषयावर देखील त्यांनी भाष्य केले आहे. गेल्या आठ वर्षापासून या परिसरात शिंदेशाही सुरु आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत मनसेच्या मदशीशिवाय कल्याणचा पुढचा खासदार होऊ शकत नाही असे म्हटले. मनसे आमदार पाटील यांच्या टिकेला शिंदे गटातील युवा सेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

ठाणे जिल्ह्यातील मनसे काटई गाव प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आहे. राजू पाटील यांचा गाव कटाई आहे. म्हणून त्यांच्या गावाच्या उल्लेख करत दीपेश म्हात्रे यांनी ही टीका केली आहे. इतकेच नाही तर 2009 साली मनसेचे 13 आमदार होते. 2014 एक आमदार आणि आत्ताही एकच आमदार आहे. त्यांनी आमदार वाढविले पाहिजे. त्यांना खासदारकी लढायची नाही तर खासदारकीचे स्वप्न का पाहता असा टोला दिला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा