Ambarnath  Team Lokshahi
ताज्या बातम्या

शितल म्हात्रे यांची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करा, अंबरनाथमध्ये युवासेनेकडून पोलिसांना निवेदन

लढायचं असेल तर समोर येऊन लढा, महिलेची बदनामी करणं ही शिवरायांची शिकवण नव्हे! युवासेनेचं बदनामी करणाऱ्यांना आव्हान

Published by : Sagar Pradhan

मयुरेश जाधव|मुंबई: शिवसेना उपनेत्या शितल म्हात्रे यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला जातोय. हा व्हिडिओ तयार करून आणि पसरवून म्हात्रे यांची समाजात बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी अंबरनाथच्या युवा सेनेकडून पोलिसांना करण्यात आली आहे.

शिवसेनेची सध्या आशीर्वाद यात्रा सुरू आहे. या यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार प्रकाश सुर्वे, उपनेत्या शितल म्हात्रे या सहभागी झाल्या होत्या. या यात्रेदरम्यानचा एक व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने पसरवला जात असून यातून शीतल म्हात्रे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तयार करणाऱ्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी युवा सेनेच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य स्नेहल कांबळे यांनी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांकडे केली आहे.

याबाबत त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांना निवेदन देखील दिलं आहे. आमच्याशी लढायचं असेल, तर समोर येऊन लढा. एखाद्या महिलेची बदनामी करणं ही शिवरायांची शिकवण नव्हे, असं म्हणत स्नेहल कांबळे यांनी बदनामी करणाऱ्यांना यावेळी आव्हान देखील दिलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : ठाकरेंच्या शिवसेनचं राजव्यापी आंदोलन

Ladki Bahin Yojana : सोलापूरमध्ये लाडकी बहीण योजनेत धक्कादायक उघड: दहा हजार महिलांचा ठावठिकाणा नाही

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर सुरेश धस यांचे विधान; राजकीय वर्तुळात खळबळ

Mumbai Local Train Megablock : हार्बर मार्गावरील सेवा 14 तास बंद, प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था