ताज्या बातम्या

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेचा दणदणीत विजय; बारामतीत जोरदार जल्लोष

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी 24 सप्टेंबरला मतदान पार पडलं.

Published by : Siddhi Naringrekar

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी 24 सप्टेंबरला मतदान पार पडलं. काल 27 सप्टेंबरला मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या मुंबई सिनेट निवडणुकीत युवासेनेचा विजय झाला आहे. विजयानंतर मातोश्री आणि शिवसेना भवन परिसरात मोठा जल्लोष करण्यात आला.

राखीव गटाच्या पाचही जागांवर आदित्य ठाकरेंच्या युवासेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. 22 सप्टेंबर रोजी ही निवडणूक होणार मात्र याला राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आली होती. मात्र कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक घेण्यात आली.

10 जागांपैकी 9 जागांवर युवासेनाचे उमेदवार विजयी झाले आहेत. एकूण 38 मतदान केंद्रावर आणि 64 बुथवर ही निवडणूक पार पडली असून या निवडणुकीसाठी 10 जागांसाठी एकूण 28 उमेदवार उभे होते.

याच पार्श्वभूमीवर युवासेनेच्या वर्चस्वानं बारामतीत मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेला मिळालेल्या यशामुळे फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त करण्यात आला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Rupali Chakankar : 'महाराष्ट्रात ब्रम्हा, विष्णु, महेशाचं सरकार, रूपाली चाकणकर यांच्याकडून नेत्यांची देवाबरोबर तुलना

Laxman Hake Controversy : "लक्ष्मण हाकेंची जीभ हासडणाऱ्यास लाखाचे बक्षीस", जरांगेंचे समर्थक संतापले

Mumbai Indians New Name : मुंबई इंडियन्स संघाबाबत मोठा निर्णय; संघाचे नाव बदलून नवं नाव ठेवणार, 'एमआय...'