महाराष्ट्रातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठी आरक्षणाची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील अध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे, तर पुणे जिल्ह्यातील अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी निश्चित झाले आहे. साताऱ्यातील अध्यक्षपद मागासवर्गीय महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले असून विविध जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीय गटांसाठीही जागा आरक्षित झाल्या आहेत.
जाहीर झालेल्या यादीनुसार, नाशिक, जळगाव, सिंधुदुर्ग, बुलढाणा, यवतमाळ यांसारख्या जिल्ह्यांमध्ये अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी राखीव ठेवले आहे. तर पालघर, नंदुरबार, अकोला, वाशिम या जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जमाती गटासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. बीड, हिंगोली, परभणी, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जातींसाठी अध्यक्षपद राखीव ठेवण्यात आले आहे.
याशिवाय, रत्नागिरी, धुळे, सातारा, सोलापूर, जालना, नांदेड, धाराशिव आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) गटासाठी अध्यक्षपदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. कोल्हापूर, सांगली, अमरावती, लातूर, गोंदिया, गडचिरोली यांसारख्या जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण महिलांसाठी अध्यक्षपद राखीव ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, भारत निवडणूक आयोगाने देशव्यापी विशेष पुनरावलोकन मोहिमेच्या तयारीसाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक नवी दिल्लीत आयोजित केली. या बैठकीत मतदार यादीचे पुनरावलोकन, केंद्रांचे सुसूत्रीकरण, पात्र नागरिकांचा समावेश आणि अपात्रांचा वगळ यावर भर देण्यात आला. आयोगाने जिल्हास्तरीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण व नियुक्तीबाबतही आढावा घेतला आहे
ठाणे -सर्वसाधारण (महिला)
पालघर – अनुसुसूचित जमाती
रायगड- सर्वसाधारण
रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सिंधुदुर्ग – सर्वसाधारण
नाशिक -सर्वसाधारण
धुळे -नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
नंदूरबार-अनुसूचित जमाती
जळगांव – सर्वसाधारण
अहिल्यानगर अनुसूचित जमाती (महिला)
पुणे -सर्वसाधारण
सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सांगली – सर्वसाधारण (महिला)
सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)
छत्रपती संभाजीनगर -सर्वसाधारण
जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
बीड – अनुसूचित जाती (महिला)
हिंगोली -अनुसूचित जाती
नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग
धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
लातूर – सर्वसाधारण (महिला)
अमरावती – सर्वसाधारण (महिला)
अकोला – अनुसूचित जमाती (महिला)
परभणी – अनुसूचित जाती
वाशिम अनुसूचित जमाती (महिला)
बुलढाणा -सर्वसाधारण
यवतमाळ सर्वसाधारण
नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
वर्धा- अनुसूचित जाती
भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग
गोंदिया – सर्वसाधारण (महिला)
चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)
गडचिरोली -सर्वसाधारण (महिला)