थोडक्यात
शांततेसाठी दिल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्काराची आज घोषणा झाली
डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वप्न भंगलं
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार न मिळण्यामागे अनेक कारणं
अखेर शांततेसाठी दिल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्काराची आज घोषणा झाली आहे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना मोठा झटका बसला आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी शांततेचं नोबेल आपल्याला मिळावं यासाठीप्रचंड प्रयत्न केले, रशिया, युक्रेन युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यात मात्र यश आलं नाही. गाझा आणि इस्रायलमध्ये त्यानंतर त्यांनी सुरू असलेलं युद्ध थांबवलं. मात्र एवढं करून देखील नोबेल पुरस्कारानं त्यांना हुलकावणी दिली आहे. व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचादो यांना यावर्षीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वप्न भंगलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हा पुरस्कार मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले, अनेक दावे केले मात्र तरी देखील डोनाल्ड ट्रम्प हे शांततेचा नोबेल जिंकू शकले नाहीत. त्यांनी आपण अनेक युद्ध थांबवली आहेत, असा दावा देखील केला, मात्र तरी देखील त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला नाही. ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार न मिळण्यामागे अनेक कारणं सांगितली जात आहेत.
तज्ज्ञांच्या मते ज्यांच्या प्रयत्नांचे चिरस्थायी आणि परिवर्तनकारी परिणाम होतात, नोबेल पुरस्कार देण्यासाठी त्यांचा प्रामुख्यानं नोबेल कमिटी विचार करते. सर्वात मोठं कारण ट्रम्प यांना शांततेचं नोबेल न मिळण्याचं म्हणजे ते या पुरस्कारासाठी असलेले जे मापदंड आहेत ते पूर्ण करू शकले नाहीत. जेव्हा नोबेल कमिटी एखाद्या व्यक्तीचा या पुरस्कारासाठी विचार करते तेव्हा पहिली अट ही असते की त्या व्यक्तीने जे शांततेसाठी प्रयत्न केले आहेत, ते चिरकाल असले पाहिजेत, तसेच अशा व्यक्तीने जगात बंधुता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प हा पामदंड पूर्ण करू शकले नाहीत, कारण जगातील अशा अनेक संस्था आहेत, ज्यांच्याप्रती डोनाल्ड ट्रम्प यांचा व्यवहार हा पक्षपातीपणाचा राहिला आहे, तसेच जागतिक हवामान बदलाच्या समस्येसाठी संपूर्ण जगभरातून प्रयत्न सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र त्याच्या विरोधात भूमिका घेतली आहे.
हेनरी जॅक्सन सोसायटीचे इतिहासकार आणि संशोधक थिओ जेनो यांनी सांगितलं की, डोनाल्ड ट्रम्प यांनी जे शांततेसाठी प्रयत्न केले ते चिरकालतेच्या कसोटीवर उतरताना दिसत नाहीत. तात्पुरत्या स्वरुपात एखादं युद्ध थांबवणं आणि युद्धच होऊ नये यासाठी प्रयत्न करणं यात प्रचंड अंतर आहे. मात्र ट्रम्प यांच्याकडून केवळ हे युद्ध थांबवण्याचा दावा करण्यात आला, मात्र युद्धच होऊ नये यासाठी प्रयत्न झालेले दिसत नाहीत. मागच्या काही वर्षांमध्ये ज्यांना -ज्यांना शांततेचा नोबेल मिळाला आहे, त्यांची यादी पहा त्यामध्ये त्यांनी समस्येवर तात्पुरत्या स्वरुपात उपाय शोधलेला नाहीये, तर त्यावर कायम स्वरुपी उपाय योजना काय करता येईल यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र डोनाल्ड ट्रम्प या मापदंडामध्ये कुठेही बसत नाहीत.
वारंवार नोबेल पुरस्कार मलाच मिळणार असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करण्यात येत होता, मात्र असा वारंवार दावा करणं देखील त्यांच्याविरोधात गेलं. राजकीय दबावापुढे तज्ज्ञांच्या मते नोबेल कमिटी कधीही झुकत नाही, त्यामुळे वारंवार असा दावा ट्रम्प यांनी केल्यानंतरही त्यांना जर हा पुरस्कार देण्यात आला असता तर एक वेगळा संदेश जगभरात गेला असता त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला नाही.