भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना काही दिवसांपासून वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत होती. संगीतकार पलाश मुच्छलसोबत तिचं लग्न ठरलं होतं, पण ते अचानक रद्द झाल्याने सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या. या सर्वांनंतर स्मृती पहिल्यांदाच एका कार्यक्रमात सर्वांसमोर आली आणि तिने शांतपणे आपली भूमिका स्पष्ट केली.
कार्यक्रमात सूत्रसंचालक मंदिरा बेदी यांनी स्मृतीला विचारलं,मी “इतक्या गोष्टी घडत असताना तू क्रिकेटवर कशी लक्ष ठेवतेस?”मी यावर स्मृती म्हणाली, “मला क्रिकेटपेक्षा जास्त काहीच आवडत नाही. भारतीय जर्सी घातली की बाकीच्या सगळ्या समस्या आपोआप बाजूला पडतात.” 2025 च्या विश्वचषकाबद्दल बोलताना तिने सांगितलं, “कधीकधी गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत. प्रत्येक डाव शून्यापासून सुरू करावा लागतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, स्वतःसाठी खेळू नका, संघासाठी खेळा.”
लग्न रद्द करण्याबाबत स्मृतीचं स्पष्ट म्हणणं
काही दिवसांपूर्वी स्मृतीने सोशल मीडियावर लिहिलं होते की तिचं आणि पलाश मुच्छलचं लग्न रद्द झालं आहे. कारण काय, याबाबत तिने काहीही सांगितलं नाही.
“माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक अफवा पसरत आहेत. पण एक गोष्ट स्पष्ट,लग्न रद्द झालं आहे. कृपया हा विषय इथंच थांबवावा.” सोशल मीडियावर पलाशच्या दुसऱ्या नात्यामुळे लग्न मोडलं अशी चर्चा सुरू आहे, पण स्मृतीने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
स्मृतीचा संदेश, गोष्टी कितीही बदलल्या तरी क्रिकेटच महत्त्वाचं
स्मृती मानधनाने संयमाने आणि शांतपणे स्वतःची बाजू सांगितली.
वैयक्तिक आयुष्यात अडचणी आल्या तरी ती पुन्हा क्रिकेटवर पूर्ण लक्ष देत आहे.