Candidates Profile

Nilesh Rane win Kudal Malvan Constituency: । कोकणात धक्कादायक निकाल, वैभव नाईकांचा पराभव, निलेश राणे विजयी

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. कारण निलेश राणे यांना तब्बल 53 हजार मतांचं मताधिक्यांनी विजय मिळवला आहे.

Published by : shweta walge

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. कारण निलेश राणे यांना तब्बल 53 हजार मतांचं मताधिक्यांनी विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे निलेश राणे यांनी निवडणुकांपूर्वीच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करुन निवडणूक लढवली होती. अखेर, त्यांनाही येथील मतदारसंघात यश मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.

निलेश राणे यांना कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार वैभव नाईक मैदानात होते. वैभव नाईक हे ठाकरेंच्या शिवसेनेशी एकनिष्ठ राहिल्याने त्यांचं पारडं जड मानलं जात होतं.

उमेदवाराचं नाव - निलेश नारायण राणे

पक्षाचं नाव - शिवसेना

मतदारसंघ - कुडाळ मालवण

समोर कोणाचं आव्हान - वैभव नाईक

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार माजी खासदार निलेश राणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निलेश राणे यांनी तब्बल 20 वर्षांनी पुन्हा एकदा धनुष्यबाण हाती घेतला. कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात यंदा साऱ्यांचं लक्ष लागले आहे. या मतदारसंघात वैभव नाईक आणि निलेश राणे यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे.

निलेश राणे 2009 ते 2014 काँग्रेसमध्ये होते. 2014 मध्ये लोकसभेच्या खासदार निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी निलेश राणे यांचा पराभव केला . त्यानंतर पुन्हा 2019मध्ये लोकसभेच्या खासदार निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी निलेश राणे यांचा पराभव केला.

कुडाळ-मालवण मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आमदार वैभव नाईक आणि शिवसेनेकडून निलेश राणे यांच्यात चुरशीची लढत होत आहे. 2014 मध्ये वडील नारायण राणे यांचा कुडाळ-मालवण विधानसभेत पराभव झाला होता. यातच आता निलेश राणे निवडणूक लढवत आहेत. यातच आता विद्यमान आमदार वैभव नाईक यांचा ग्रामीण भागातील संपर्क पाहता निलेश राणे यांनी सुद्धा जनसंपर्क वाढविल्याचे पाहायला मिळत आहे.

निलेश राणे हे राजकारणासोबतच समाजकारणही करत असतात. तौकते वादळ, दरवर्षी होणारी अतिवृष्टी यामध्ये होणारे नुकसान यावेळी अनेक कुटुंबांना मदत केलेली आहे. आरोग्याच्या दृष्टीने अनेक जणांना आर्थिक मदत करून दिलेली पाहायला मिळाली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pigeon Feeding : नियंत्रित पद्धतीने कबुतरांना खाद्य देण्यासाठी तीन संस्थांनाचे अर्ज

Latest Marathi News Update live : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर 2 विशेष गाड्या धावणार; प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Accident : मुंबईच्या शिवडी येथे शाळेच्या बसचा अपघात; 4 मुलं जखमी

GST मध्ये मोठे बदल ; आता 5 टक्के आणि 18 टक्के असे दोन टप्पे