संतोष परब हल्लाप्रकरणी अडचणीत सापडलेले भाजपचे आमदार नितेश राणे आज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाला शरण आले.यावेळी नितेश राणे यांच्यावतीने कोर्टात नियमित जामिनासाठी अर्ज करण्यात आला. या नियमित अर्जावर आता सोमवारी सुनावणी होणार आहे.त्यामुळे नितेश राणेंना जामीन मिळतो का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांना दहा दिवसात शरण येण्यास सांगितले होते. तसेच कनिष्ठ न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र, तोपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आले होते. त्यानंतर नितेश यांनी आज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाला शरण आले होते.
वकिलांसोबतच नितेश राणे कोर्टात आले होते. कोर्टात नियमित जामिनासाठी अर्ज केल्यानंतर वकिलांनी कोर्टात नितेश यांची बाजू मांडली. त्यानंतर कोर्टाने या प्रकरणावर सोमवारी सुनावणी ठेवली. त्यानंतर राणेंच्या वकिलांनी मीडियाशी संवाद साधला. राणेंच्या नियमित अर्जावर सोमवारी 11 वाजता सुनावणी होणार आहे. त्यामुळे नितेश राणेंना जामीन मिळतो का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.