Uncategorized

नोव्हाक जोकोव्हिचने कोरलं ऑस्ट्रेलियन ओपनवर नाव

Published by : Lokshahi News

'मेलबर्न पार्कचा राजा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिचने नव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावले आहे.नऊ वेळा अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या जोकोव्हिचने एकदाही हार पत्करली नाही. जोकोव्हिच यानं मेदवेदेवचा 7-5 6-2 6-2 अशा फरकानं पराभव केला.

आज झालेल्या अंतिम फेरीत नोव्हाक जोकोव्हिचचा सामना डॅनिल मेदवेदेवशी होता. या सामन्यात जोकोव्हिचने डॅनिल मेदवेदेवचा 7-5 6-2 6-2 अशा फरकानं पराभव करत जतेपदावर नाव कोरलं आहे. तर जोकोव्हिचनं नवव्या ऑस्ट्रेलियन जेतेपद पटाकवलं आहे.

चौथ्या मानांकित मेदवेदेवने अलीकडे पॅरिस मास्टर्स, एटीपी फायनल्स आणि एटीपी चषक जिंकले आहेत. मेदवेदेव हा मरात सॅफिननंतर (२००५) ऑस्ट्रेलियन स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा रशियाचा पहिला टेनिसपटू ठरला आहे.

अव्वल खेळाडूंविरुद्ध सहज विजय मिळवणाऱ्या मेदवेदेवने विजयाची मालिका अखंड राखली आहे. लंडनमध्ये मलाही त्याने सरळ सेटमध्ये पराभूत केले आहे. दमदार सव्‍‌र्हिस तसेच ताकदवान फोरहँड व बॅकहँड असलेल्या मेदवेदेने कामगिरीत प्रचंड सुधारणा केली असल्याचे नोव्हाक जोकोव्हिचने सांगितले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा