Vidhansabha Election

सना मलिक आणि नवाब मलिक यांच्या प्रचारासाठी आता अजित पवार मैदानात उतरणार

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • नवाब मलिकांच्या प्रचारासाठी अजित पवार मैदानात

  • सायंकाळी 4 वाजता प्रचार सभेचं आयोजन

  • अजित पवार स्वतः नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या प्रचारासाठी उपस्थित राहणार

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.

राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अणुशक्तीनगर आणि शिवाजीनगर मानखुर्दचे उमेदवार सना मलिक आणि नवाब मलिक यांच्या प्रचारासाठी अजित पवार मैदानात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे.

अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 4 वाजता टाटा नगर, पाचनळ, गोवंडी येथे भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून भाजप कडून नवाब मलिक यांना विरोध केला जात आहे मात्र आता अजित पवार आज स्वतः नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या प्रचारासाठी उपस्थित राहणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस