India

‘दोन डोसमधलं अंतर दुप्पट करण्याची शिफारस केलीच नव्हती’; भारतीय वैज्ञानिकांचा धक्कादायक खुलासा!

Published by : Lokshahi News

गेल्या महिन्यात १३ मे रोजी केंद्र सरकारने कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर ६ ते ८ आठवड्यांवरून दुप्पट करत १२ ते १६ आठवडे निश्चित केलं. हा निर्णय वैज्ञानिकांच्या गटानं केलेल्या शिफारशींनुसार घेतल्याचं देखील सांगितलं गेलं. पण आता त्याच वैज्ञानिकांनी धक्कादायक खुलासा केला आहे. लसीच्या दोन डोसमधलं अंतर वाढवून दुप्पट करण्याला आमचा पाठिंबा नव्हता, असा खुलासा तज्ज्ञ गटातल्या ३ सदस्यांनी केला आहे. रॉयटर्सनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या या निर्णयावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

एकीकडे देशात लसींचा तुटवडा असल्याचं समोर येत असताना दुसरीकडे केंद्र सरकारने कोविशिल्डच्या दोन डोसमधलं अंतर १२ ते १६ करण्याचा निर्णय जाहीर केला. यासाठी केंद्र सरकारच्या नॅशनल टेक्निकल अॅडवायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (NTAGI) या गटाने अंतर वाढवण्याच्या दिलेल्या सल्ल्यावरून हा निर्णय घेतल्याचं देखील जाहीर करण्यात आलं. या गटाने अंतर दुप्पट करण्याला कधीही समर्थन दिलं नव्हतं, असा खुलासा यापैकी काही तज्ज्ञांनी केला आहे.

नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ एपिडेमोलॉजीचे माजी संचालक एम. डी. गुप्ते रॉयटर्सशी बोलताना म्हणाले, "NTAGI च्या वैज्ञानिकांनी ८ ते १२ आठवड्यांपर्यंत अंतर वाढवण्यावर सहमती दर्शवली होती. जागतिक आरोग्य संघटनेकडूनदेखील याचा सल्ला दिला आहे. पण १२ ते १६ आठवडे हे केंद्र सरकारचे आकडे आहेत. दोन डोसमधलं अंतर १२ आठवड्यांपेक्षा जास्त झालं तर १२ आठवड्यांनंतर कोणते संभाव्य परिणाम होऊ शकतात, याचा कोणताही डाटा NTAGI कडे नाही", असं गुप्ते म्हणाले आहेत. NTAGI मधलेच दुसरे सदस्य मॅथ्यु वर्गेसी यांनी देखील गुप्तेंच्या दाव्याला दुजोरा दिला. "NTAGI नं फक्त ८ ते १२ आठवड्यांपर्यंत अंतर वाढवावं असा सल्ला दिला होता", असं ते म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : काल एक गद्दार बोलला 'जय गुजरात' - उद्धव ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "मराठी शिकणारे शिक्षणमंत्री इंग्रजीमध्ये शिकणारे मुख्यमंत्री..." राज ठाकरेंचा नाव न घेता टोला

Raj Thackeray Live : 'जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलंय'; राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Raj-Uddhav Thackeray Family Member Vijayi Melava : सहकुटुंब सहपरिवार..; ठाकरे बंधूंचे कुटुंब एकाच व्यासपीठावर