आधार कार्ड ही आता सगळ्यांची एक प्राथमिक ओळख आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुमची अनेक महत्त्वाच्या कामांचा खोळंबा होऊ शकतो. अगदी सरकारी कार्यालयापासून ते अगदी क्लबमध्येदेखील ओळख पटवण्यासाठी आधार कार्डचा वापर होतो. त्यामुळे आधार कार्ड हे खूप महत्त्वाचे असलेले मानले जाते. पण आता या आधार कार्ड संबंधित एक नवीन अपडेट समोर आली आहे.
जर तुमचे आधार कार्ड 10 वर्षे किंवा त्याहून अधिक जुने असेल आणि तुम्ही अपडेट केले नसेल, तर तुम्ही काही दिवसांतच ते मोफत अपडेट करू शकणार आहात. UIDAI ने myAadhaar पोर्टलवर ही सुविधा प्रदान केली आहे, यामध्य तम्ही ऑनलाइन जाऊन ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा सारखे कागदपत्रे कोणतेही शुल्क न भरता अपडेट करू शकता. 14 जून 2025 या तारखेपर्यंत मोफत आधार अपडेट करता येणार आहे.
14 जून या तारखेनंतर तुम्हाला आधार अपडेटसाठी शुल्क भरावे लागेल, परंतु जर तुम्ही 14 जूनपूर्वी आधार अपडेट केले तर तुम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा फक्त myAadhaar वेबसाइटवर उपलब्ध आहे. जर तुम्ही आधार केंद्राला भेट देऊन हे अपडेट केले तर तुम्हाला यासाठी ₹ 50 शुल्क भरावे लागेल.
'आधार' ऑनलाइन अपडेट कसे करायचे?
- मोफत आधार अपडेट करण्याची ऑनलाइन प्रक्रिया
- सर्वप्रथम तुमच्या ब्राउझरवर https://myaadhaar.uidai.gov.in ही वेबसाइट उघडा
- या वेबसाईटवर "लॉगिन" वर क्लिक करा आणि तुमचा 12 अंकी आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरा.
- कृती करा आणि नंतर "OTP पाठवा" वर क्लिक करा.
- तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक OTP येईल, तो एंटर करा आणि लॉगिन करा.
- लॉगिन केल्यानंतर, "कागदपत्र अपडेट" पर्यायावर क्लिक करा.
- आता तुमच्या नवीन माहितीशी संबंधित कागदपत्रे अपलोड करा
- फोटोचे स्वरूप JPEG, PNG किंवा PDF असावे. तसेच आकार 2MB पेक्षा कमी असावा.
- अपलोड केलेली माहिती तपासा आणि नंतर "सबमिट करा" बटणावर क्लिक करा.
- सबमिट केल्यानंतर, तुम्हाला एक सेवा विनंती क्रमांक (SRN) मिळेल, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या अपडेट केलेल्या आधार कार्डची स्थिती ट्रॅक करू शकता.