Job Recruitment Team Lokshahi News
इतर

कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळात नोकरीची संधी, असा करा अर्ज

कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत विविध पदांच्या एकूण 349 जागांच्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

Published by : Pankaj Prabhakar Rane

कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत विविध पदांच्या एकूण 349 जागांच्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दरम्यान नॉन रिसर्च मॅनेजमेंट पोजिशनच्या 349 जागा भरण्यात येणार आहेत.

यामध्ये प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर हेड ऑफ डिविजन, हेड ऑफ रीजनल स्टेशन/सेंटर, सिनियर सायंटिस्ट-कम-हेड, KVK या जागांचा समावेश आहे. वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता डॉक्टोरल पदवी किंवा समतुल्य आणि 03 वर्षे अनुभव अशी आहे.

प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर हेड ऑफ डिविजन, हेड ऑफ रीजनल स्टेशन/सेंटर, सिनियर सायंटिस्ट-कम-हेडसाठी वयाची अट 60 वर्षांपर्यंत तर सिनियर सायंटिस्ट-कम-हेड, KVK साठी 47 वर्षांपर्यंत असेल. तर नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत सांगण्यात आले आहे. सामान्य/ ईडब्ल्यूएस/ ओबीसी प्रवर्गासाठी 1 हजार 500 रूपये फी असेल तर एससी/ एसटी/पीडब्ल्यूडी/महिलांसाठी फी नाही.

प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर हेड ऑफ डिविजन, हेड ऑफ रीजनल स्टेशन/सेंटर, सिनियर सायंटिस्ट-कम-हेडसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 31 ऑक्टोबर 2022 आहे. तर सिनियर सायंटिस्ट-कम-हेड, KVK साठी 11 नोव्हेंबर 2022 आहे. अधिक माहितीसाठी http://www.asrb.org.in/ अधिकृत वेबसाईट पाहा.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा