Health Lokshahi Team
इतर

Tobacco and Cancer | वेळीच सावध व्हा तोंडातील कर्करोगापासून; नाहीतर....

Published by : prashantpawar1

तोंडाचा कर्करोग (Cancer) झपाट्याने पसरतो हे तर आपल्याला नक्कीच माहिती असावं. या आजाराचे कारण म्हणजेच गुटखा आणि धूम्रपान म्हणू शकतो. दातांबद्दल थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला कॅन्सरला बळी पाडू शकतो. दातांची नियमित स्वच्छता आणि काळजी घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे अगदी आवश्यक आहे. दातांच्या वाढत्या समस्येच्या पार्श्वभूमीवर पीजीआय चक्रपाणपूरचे दंतचिकित्सक डॉ. ज्ञानेंद्र कुमार यादव यांना एका कार्यक्रमात आमंत्रित केले होते. काही लोकांनी दातांच्या समस्येशी संबंधित त्यांना प्रश्न विचारले असता त्यांनी याबद्दलची उत्तरे देऊन सर्वांचे समाधान केले. डॉ.ज्ञानेंद्रकुमार यादव म्हणतात की सध्या दातांच्या समस्येमुळे लोकांमध्ये कॅन्सर होण्याची भीती अधिक प्रमाणात वाढते आहे. कर्करोग हा प्रथम ओठांजवळ, जिभेवर, दातांच्या हिरड्यांमध्ये किंवा घशाजवळ दिसून येतो.

तोंडात व्रण, ढेकूळ किंवा पांढरे पुरळ, 20 पेक्षा जास्त असल्यास तोंडातीळ व्रण अन्न गिळताना दुखणे किंवा त्रास होणे, घशात काहीतरी अडकणे आणि दातांजवळ गुठळ्या होणे ही कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे आहेत. पहिल्या टप्प्यात उपचार सुरू केले तर तो बरा होऊ शकतो. तोंडाचा कर्करोग महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त आढळतो.

गरोदरपणात महिलांना दातांच्या समस्या जास्त होतात. कारण गर्भधारणेदरम्यान हार्मोनल समस्या अधिक असतात. त्यामुळे हिरड्या दुखणे, दात दुखणे, हिरड्यांमधून रक्त येणे इत्यादी समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत गर्भवती महिलांना कॅल्शियमची जास्त गरज असते. हे पूर्ण करण्यासाठी दूध, दही यासह कॅल्शियमयुक्त पदार्थ घ्यावेत

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ashadhi Wari 2025 : आषाढीचा उपवास कधी सोडावा जाणून घ्या...

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी वारीसाठी एसटी महामंडळाकडून विशेष गाड्यांची सुविधा; जाणून घ्या

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात पावसाचा तांडव ; ढगफुटीमुळे 69 मृत्यू, 400 कोटींचं नुकसान

Amit Shah Pune : "बाजीराव पेशवेंनी 40 वर्षाच्या आयुष्यात..." पुण्यात शाहांकडून पेशवांच्या शौर्यावर भाष्य