इतर

Cyber Attack : आजवरची सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी चोरी, बायबिट वॉलेट हॅक

याबद्दल bybit चे CEO बेन झुओ यांनी याबद्दल सांगितले की एक्सचेंजसाथी एथेरीयम वॉलेटला हॅक करण्याचा प्रयत्न होता.

Published by : Team Lokshahi

क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज Bybit ला नुकताच एका सायबर हल्ल्याचा सामना करावा लागला आहे. यामध्ये तब्बल 12848 कोटी रुपयांची क्रिप्टोकरन्सी चोरी झाली आहे. आतापर्यंतचा हा सर्वात मोठी सायबर हल्ला आहे. याबद्दल bybit चे CEO बेन झुओ यांनी याबद्दल सांगितले की एक्सचेंजसाथी एथेरीयम वॉलेटला हॅक करण्याचा प्रयत्न होता. यामध्ये 1. 46 बिलियन डॉलर्सची क्रिप्टोकरन्सी वेगवेगळ्या व्यवहाराच्या माध्यमातून काढली गेली आहे. मात्र bybit आताही सॉल्व्हेंट आहे आणि सर्व वापरकर्त्यांची संपत्ती सुरक्षित आहेत. एक्सचेंजने ब्रिज लोनच्या माध्यमातून झालेला तोटा भरुन काढण्यासाठी आवश्यक अशी 80% रक्कम सुरक्षित ठेवली होती.

चोरी झालेली झालेली संपत्ती परत मिळवण्यासाठी हॅकर्सच्या विरोधात कायदेशीर कारवाईदेखील केली जात असल्याचे समोर आले आहे. ब्लॉकचेन विश्लेषक ZachXBT ने सर्वात आधी या हल्ल्याबाबतची माहिती दिली. हॅकरने 1.1 बिलियन डॉलर , megaETH, Staked ether ला एका नवीन वॉलेटमध्ये ट्रान्सफर केले आहे.

ब्लॉकचेन सिक्युरिटी फर्म इलिप्टिकला शंका आहे की या हल्ल्याला उत्तर कोरियाचे हॅकर्स जबाबदार असू शकतात. ऑन-चेन विश्लेषक ZacksBT आणि संशोधन फर्म Arkham Intelligence यांनी सांगितले की चोरी झालेले पैसे नवीन अकाऊंटवर जाऊ लागला आहे आणि तिथून त काढले जात आहेत.

ब्लॉकचेन सिक्युरिटी फर्म इलिप्टिकच्या म्हणण्यानुसार या चोरीने 2021 मध्ये पॉली नेटवर्कमधून 611 दशलक्ष डॉलर चोरीचा मागील रेकॉर्ड मागे टाकला आहे. सुरक्षा तज्ज्ञ रॉब बेहन्के यांनी "आतापर्यंतचा सर्वात मोठा आर्थिक सायबर हल्ला" असे वर्णन केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा