14 february Cow Hug Day  Team Lokshahi
इतर

प्रेमवीरांना केंद्र सरकारचा सल्ला; ‘व्हॅलेंटाईन डे’ जोडीदाराला नाही तर गाईला मारा मिठी...

केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने १४ फेब्रुवारी हा दिवस ‘काऊ हग डे’ अर्थात ‘गाईला आलिंगन दिन’ म्हणजेच गाईला मिठी मारून साजरा करण्याचे निर्देश दिले आहे.

Published by : Sagar Pradhan

सध्या हा ‘व्हॅलेंटाईन डे’ वीक सुरु आहे. प्रेमवीरांनामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच आता प्रेमवीरांनासाठी केंद्र सरकारने एक कमालचा सल्ला दिला आहे. 14 फेब्रुवारी हा ‘व्हॅलेंटाईन डे’ अर्थात जागतिक प्रेमदिन म्हणन सर्वत्र साजरा केला जातो. मात्र केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने १४ फेब्रुवारी हा दिवस ‘काऊ हग डे’ अर्थात ‘गाईला आलिंगन दिन’ म्हणजेच गाईला मिठी मारून साजरा करण्याचे निर्देश दिले आहे. तसे या संदर्भात पत्र देखील या विभागाकडून काढण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय मंत्रालयाचे सचिव डॉ.एस.के.दत्ता यांनी हे पत्रक काढून निर्देश दिले आहेत. या पत्रात ते म्हणाले की, गाय ही भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा बाजू आहे. गाय ही पशुधन आणि जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करते. सोबतच मानवी जीवन टिकवते, सर्व ऐश्वर्य प्रदान करणारी, आईसारख्या प्रेमळ स्वभावामुळे गायीला ‘कामधेनू’ आणि ‘गौमाता’ म्हणून ओळखले जाते. काळानुसार पाश्चात्य संस्कृतीच्या प्रगतीमुळे वैदिक परंपरा जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पाश्चिमात्य संस्कृतीच्या झगमगाटाने आपली भौतिक संस्कृती आणि वारसा जवळजवळ विसरला आहे. गाईचा प्रचंड फायदा पाहता, गाईला मिठी मारल्याने भावनिक समृद्धी येते. त्यामुळे आपला वैयक्तिक आणि सामूहिक आनंद वाढतो. त्यामुळे सर्व गाईप्रेमींनी १४ फेब्रुवारी हा दिवस गाईचे महत्त्व लक्षात घेऊन गाईला आलिंगन दिन म्हणून साजरा करावा आणि जीवन आनंदी आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण करावे. असे ते म्हणाले या पत्रात म्हणाले आहे. परंतु, आता या पत्राची प्रचंड चर्चा होत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा