Admin
Admin
इतर

गायीच्या शेणापासून तयार केल्या इको फ्रेंडली राख्या; राज्यात या राख्यांची मागणी

Published by : Siddhi Naringrekar

उदय चक्रधर, गोंदिया

राखी सण येताच बाजारात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या विक्रीला येतात, चीनी राख्या ही मोठ्या प्रमाणात येत असल्याने गोंदिया येथील एका महिलेने इको फ्रेंडली राखी म्हणून चक्क शेणापासून राख्या तयार केल्या आहेत. तर ह्या शेणाच्या राख्यांना जिल्ह्यासह राज्यात तसेच दुसऱ्या राज्यातही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कडून सन्मान पत्र देखील मिळविलेला आहे.

गोंदिया तालुक्यातील चुटिया गाव येथील प्रीती टेमभरें यांनी पाच वर्षा आधी गावात गीर प्रजातीच्या गायीची गोशाळा उघडली. या गौशाळेला फक्त दुधापर्यंत मर्यादित न ठेवता या गाईच्या शेणापासून सेंद्रिय खते, अगरबत्ती तयार केली. तर गौमुत्रापासून फिनाईल, औषधेही तयार केली जातात. कोरोनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून जनतेला आत्मनिर्भर होण्याचा सल्ला दिला होता. त्यात आता भारत-चीन सीमावाद यामुळे चीनी वस्तूवर बहिष्कार टाकण्यात येत आहे. हीच परिस्थिती लक्षात घेतात प्रीती यांना रक्षा बंधनाच्या उत्सवात गाईच्या शेणापासून इको फ्रेंडली राखी बनविण्याची संकल्पना सुचली. त्यांनी कामाला सुरुवात करत आधी या संकल्पनेबाबत अभ्यास केला आणि यानंतर आपली ही संकल्पना साकार केली.

ह्या इको फ्रेंडली राख्या तयार केल्या, जिल्ह्यात, राज्यासह या राख्यांना मागणी येत आहे. इतकेच नव्हे तर गुजरात, मध्यप्रदेश, केरळ, राजस्थान हैद्राबाद या सारख्या राज्यांतही या राख्यांना मागणी आहे. या माध्यमातून त्यांनी गावातील अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. त्यांना रोजगाराशी संबंधित प्रशिक्षणही द्यायला सुरुवात केली आहे. गाईच्या शेणापासून राखी कशाप्रकारे तयार करता येते, हेदेखील शिकवण्यात आले. आधी शेणाच्या गौऱ्या तयार केल्या जातात, त्यांनतर त्याची बारीक प्रमाणात पावडर तयार केली जाते. त्यानंतर डिंक, गुळ, चिंचेच्या बिया याला एकत्र करून मिश्रण तयार करण्यात येतात. मग यापासून राख्या बनविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साचे वापरले जातात आणि फुलपाखरू, सुर्यफुल, स्वस्तिक या प्रकारच्या राख्या तयार केल्या जातात.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...