इतर

आल्याची चटणी फक्त चवीलाच नाही तर रोगप्रतिकारशक्तीही चांगली ठेवते, रेसिपी वाचा

Published by : Siddhi Naringrekar

जेवणासोबत ताटामध्ये दिल्या जाणाऱ्या चटणीमुळे जेवणाची चव तर वाढतेच शिवाय व्यक्तीची भूकही वाढते. तुम्ही आजपर्यंत अनेकवेळा कोथिंबीर, मिरचीपासून बनवलेल्या चटण्या चाखल्या असतील, पण कधी मसालेदार आल्याची चटणी चाखली आहे का? होय, आल्याची चटणी खाण्यास अतिशय चविष्ट तर असतेच पण बदलत्या ऋतूमध्ये तुमच्या प्रतिकारशक्तीचीही विशेष काळजी घेते. चला तर मग विलंब न लावता जाणून घेऊया कशी बनवली जाते ही चविष्ट आले चटणी.

आल्याची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य-

- 200 ग्रॅम हिरव्या मिरच्या

-२ सुक्या लाल मिरच्या

-50 - 70 ग्रॅम चिंच

- चवीनुसार मीठ

- गरम पाणी

- 2 टीस्पून तेल

- 75 ग्रॅम आले

- 100 ग्रॅम गूळ

- 1 टीस्पून मोहरी

- 1 टीस्पून जिरे

-2 कोंब कढीपत्ता

- 2 चमचे तेल

आल्याची चटणी बनवण्यासाठी प्रथम हिरवी मिरची आणि आले धुवून त्यांचे जाड तुकडे करा. आता एका कढईत दोन चमचे तेल गरम करून त्यात 200 ग्रॅम हिरव्या मिरच्या घाला आणि मिरच्यांचा रंग बदलेपर्यंत तळा. यानंतर चिरलेले आले घालून २-३ मिनिटे परता. आले, हिरवी मिरची, गरम पाणी, गूळ आणि चिंच मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या. आता चटणीसाठी टेम्परिंग तयार करण्यासाठी, 2 चमचे तेल गरम करा आणि त्यात 1 चमचे जिरे आणि 1 चमचे मोहरी, 2 लाल सुक्या मिरच्या आणि 1 कढीपत्ता टाकून तळा. आता हे टेम्परिंग चटणीवर ओता. तुमची टेस्टी जिंजर चटणी तयार आहे.

Daily Horoscope 29 April 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचा शुभ काळ होणार सुरु; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 29 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

फडणवीसांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना धाराशिवमध्ये धरलं धारेवर; म्हणाले, "मोदींच्या ट्रेनमध्येच..."

T20 World Cup Selection : धावांचा पाऊस पाडणाऱ्या के एल राहुलचा पत्ता कट? भारतीय संघात 'या' दिग्गज खेळाडूंची केली निवड

"...म्हणून नरेंद्र मोदींच्या अंगात औरंगजेब संचारलाय"; संजय राऊतांनी सासवडमध्ये महायुतीवर डागली तोफ