इतर

Fruit Chat Recipe : मसालेदार फ्रूट चाट घरीच बनवा; आरोग्यासाठी खूप फायदेशीर

Published by : Team Lokshahi

फळांचे सेवन आपल्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. प्रत्येकाला रोज फळे खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. आजकाल जिथे एकामागून एक आजार समोर येत आहेत, अशा स्थितीत स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. सकस खाण्यापासून ते स्वच्छता राखण्यापर्यंत आपल्या आरोग्याची काळजी घेणे आपल्या हातात आहे. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी हेल्दी फ्रूट चाटची रेसिपी घेऊन आलो आहोत. याच्या सेवनाने तुमच्या शरीरातील कमकुवत प्रतिकारशक्ती, अशक्तपणाची समस्या पूर्ण होईल. याशिवाय तुमच्या शरीराला सर्व आवश्यक खनिजे आणि जीवनसत्त्वेही मिळतील.

आज आम्ही तुमच्यासाठी खास फ्रूट चाटची रेसिपी घेऊन आलो आहोत. हे बनवायला खूप सोपे आहे, तसेच खायलाही अप्रतिम आहे. त्यात डाळिंब आणि किवी देखील असल्याने डेंग्यूच्या रुग्णांनी ते जरूर खावे. हा फ्रूट चाट तुम्हाला पावसाळ्यात अनेक आजारांपासून दूर ठेवू शकतो.

2 किवी

2 डाळिंब

1 केळी

२ मोसंबी

1 टीस्पून चाट मसाला

1 टीस्पून काळी मिरी

1 लिंबू

1 टीस्पून मीठ

सर्व प्रथम, किवीचे गोल आणि पातळ काप करा.आता डाळिंब कापून सर्व दाणे एका भांड्यात काढा. केळीला गोल आकारात कापून घ्या. मोसंबी कापून त्याचे तुकडे करा.

आता ही सर्व फळे एका भांड्यात मिक्स वर लिंबू, मीठ, मिरपूड टाकून चमच्याने हलवा.

आता 5 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर सर्व्ह करा.

रोहित पवारांच्या आरोपावर अजित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

अजित पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाले...

राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर यामिनी जाधव यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

बारामतीत पैशांचा पाऊस? रोहित पवारांनी केला व्हिडिओ ट्विट

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा! राज्यातील लोकसभेच्या 11 जागांवर आज मतदान