Daily Exercise
Daily Exercise Team Lokshahi
इतर

नियमित व्यायाम करताय ना? जाणून घ्या आरोग्यदायी लाभ...

Published by : prashantpawar1

दररोज व्यायाम करणे या पद्धतीचा अवलंब अनेकजण करतात. नियमित व्यायाम करणे हे आपल्या शरीरासाठी व आरोग्यासाठी खूप लाभदायक मानले जाते. धकाधकीच्या जीवनात ताण तणावामुळे मानसिकदृष्ट्या आपण असक्षम होत असतो. व्यायामाबरोबर पुरेसा आहार देखील शरीराला आवश्यक आहे. आज आम्ही आपणास व्यायामाचे महत्व सांगणार आहोत.

स्नायूंना निरोगी ठेवते


दररोज व्यायाम केल्याने तुमचे स्नायू निरोगी राहतात. यामुळे रक्ताभिसरण सुधारते. यामुळे मेंदूच्या पेशीही सक्रिय होतात.

रक्तदाब नियंत्रित करते


दररोज व्यायाम केल्याने रक्तदाबाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळते. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

तणाव दूर करण्यासाठी


नियमित व्यायाम केल्याने तणावही दूर होतो. त्याचबरोबर डोकेदुखी आणि नैराश्य यांसारख्या अनेक समस्या दूर होतात. यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. व्यायाम हे अँटीडिप्रेसंट औषधासारखे कार्य करते.

वजन कमी करण्यासाठी


व्यायामामुळे वजन कमी होण्यास मदत होते. कॅलरी जलद बर्न होण्यास देखील मदत होते. हे चयापचय गतिमान करते. त्यामुळे नियमित व्यायाम करणे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे ठरते.

हात आणि पाय यांना आराम


आजकाल वाढत्या वयोमानामुळे हात-पाय दुखण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते असे नाही, तर खराब जीवनशैली आणि अनारोग्य आहारामुळेही अनेकांना या समस्येला सामोरे जावे लागते. यामुळे अशक्तपणा आणि थकवा सतत जाणवतो. व्यायाम केल्याने तुम्ही ऊर्जावान राहता. हातपाय दुखण्यापासून आराम मिळतो. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.

खराब कोलेस्ट्रॉलसाठी उपायकारक


उच्च कोलेस्ट्रॉलमुळे अनेकांना त्रास होतो. खराब कोलेस्ट्रॉलमुळे हृदयाशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि हृदयाशी संबंधित अनेक समस्यांचा देखील धोका वाढतो. अशा स्थितीत हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही नियमित व्यायाम करू शकता.

शरद पवारांनी PM मोदींसह अमित शहांवर फुंकली 'तुतारी', म्हणाले; "जो महागाई वाढवतो, त्यांना..."

Harbour Railway: तब्बल ४ तासांनंतर हार्बर रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर

पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीला थेट इशारा, साताऱ्यात म्हणाले, "मी जिवंत आहे, तोपर्यंत..."

IPL मध्ये जॅक्सने दाखवली 'विल'पॉवर! ख्रिस गेलचा दहा वर्षांपूर्वीचा 'हा' विक्रम मोडला

Rahul Shewale: 'कॉंग्रेसच्या विचारांचा पराभव करायचायं' अर्ज दाखल करण्यापूर्वी शेवाळेंची प्रतिक्रिया