लोकशाही स्पेशल

दिनविशेष 03 फेब्रुवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

सध्या फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. तर फेब्रुवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published by : Dhanshree Shintre

Dinvishesh 03 February 2024 : सध्या फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. तर फेब्रुवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 03 फेब्रुवारी या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

१९८६: पिक्सार ऍनिमेशन स्टुडिओ - सुरवात.

१९६६: सोव्हिएत रशियाने लूना-९ हे मानवविरहित अंतराळयान चंद्रावर उतरवले.

१९२८: सायमन गो बॅक या घोषणांनी सायमन कमिशनचा मुंबईत निषेध करण्यात आला.

१९२५: भारतात पहिल्यांदाच विजेवर चालणारी रेल्वे व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला या स्थानकांदरम्यान सुरू झाली.

१८७०: अमेरिकेच्या संविधानातील १५ वा बदल अमलात आला त्यामुळे मतदानातील वंशभेद संपुष्टात आले.

१७८३: स्पेनने अमेरिकेच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली.

आज यांचा जन्म

१९६३: रघुराम राजन - भारतीय अर्थतज्ञ

१९००: टी. आर. शेषाद्री - भारतीय रसायनशास्त्रज्ञ, शैक्षणिक - पद्म भूषण (निधन: २७ सप्टेंबर १९७५)

१८८७: हुआन नेग्रिन - स्पेनचे पंतप्रधान

१८३०: रॉबर्ट आर्थर टॅलबोट - युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान (निधन: २२ ऑगस्ट १९०३)

आज यांची पुण्यतिथी

२०२३: अँथनी फर्नांडिस - भारतीय रोमन कॅथोलिक प्रीलेट, बरेलीचे बिशप (जन्म: ६ जुलै १९३६)

२०२३: वान्नरपेट्टाई थांगराज - भारतीय अभिनेते

१९६९: सी. एन. अण्णादुराई - तामिळनाडूचे ७वे मुख्यमंत्री (जन्म: १५ सप्टेंबर १९०९)

१९६४: सी. सित्तमपालम - श्रीलंकेचे वकील आणि राजकारणी (जन्म: १३ सप्टेंबर १८९८)

१९५१: चौधरी रहमत अली - भारतीय-पाकिस्तानी शैक्षणिक (जन्म: १६ नोव्हेंबर १८९७)

१९५१: ऑगस्ट हॉच - जर्मन उद्योजक, ऑडी मोटार कंपनीचे संस्थापक (जन्म: १२ ऑक्टोबर १८६८)

१८३२: उमाजी नाईक - भारतीय आद्द क्रांतिकारक, स्वातंत्र्य सैनिक (जन्म: ७ सप्टेंबर १७९१)

१४६८: योहान्स गटेनबर्ग - जर्मन प्रकाशक, स्वयंचलित मुद्रणाचा संशोधक

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : उपराष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक, मतदानाला सुरुवात

Nepal : नेपाळ सरकारने समाजमाध्यमांवरील बंदी उठवली

Vice-Presidential Election : उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक; बीजेडी आणि बीआरएस तटस्थ राहणार

Saamana Editorial : पितृपक्षात ‘कौन बनेगा उपराष्ट्रपती?’ हाच प्रश्न आहे; उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर सामनातून भाष्य