लोकशाही स्पेशल

दिनविशेष 04 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

एप्रिल महिना सुरू झाला आहे, तर एप्रिल महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published by : Dhanshree Shintre

Dinvishesh 04 April 2024 : सध्या एप्रिल महिना सुरू झाला आहे. तर एप्रिल महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 04 एप्रिल रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२०२२: पॅरालिम्पिक - २०२२ हिवाळी पॅरालिम्पिक बीजिंग, चीन येथे आयोजित करण्यात आले आहे. बीजिंग शहर उन्हाळी आणि हिवाळी पॅरालिम्पिक दोन्हीचे आयोजन करणारे पहिले शहर बनले.

२००१: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण केले.

१९९६: चित्रकार रवी परांजपे यांना कॅग हॉल ऑफ फेम हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर.

१९७४: पिपल मॅगझिनचे पहिले प्रकाशन झाले.

१९६१: इंग्लंडमध्ये १९४६ साली बनवलेली विमानवाहू युद्धनौका भारतीय नौदलात आय. एन.एस. विक्रांत नावाने दाखल झाली.

१९५१: नवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन झाले.

१९३६: हिंडेनबर्गरचे पहिले उड्डाण झाले.

१८८२: ब्रिटन मधील पहिली इलेक्ट्रिक ट्राम पूर्व लंडन मध्ये सुरु.

१८६१: अमेरिकेच्या १६ व्या राष्ट्राध्यक्षपदी अब्राहम लिंकन यांची निवड झाली.

१८३७: शिकागो शहराची स्थापना झाली.

१७९१: व्हरमाँट हे अमेरिकेचे १४ वे राज्य बनले.

आज यांचा जन्म

१९८६: माईक क्रीगेर - इंस्ताग्रामचे सहसंस्थापक

१९३५: प्रभा राव - कॉंग्रेसच्या नेत्या

१९२६: रिचर्ड डेवोस - ऍमवेचे सहसंस्थापक

१९२५: ज्योतीन्द्रनाथ टागोर - बंगाली साहित्यिक आणि चित्रकार (निधन: ४ मे १८४९)

१९२१: फन्नीश्वर नाथ रेणू - भारतीय लेखक आणि कार्यकर्ते (निधन: ११ एप्रिल १९७७)

१९०६: एवेरी फिशर - फिशर इलेक्ट्रॉनिक्सचे निर्माते (निधन: २६ फेब्रुवारी १९९४)

१८९३: चार्ल्स हर्बर्ट कॉल्विन - पायोनियर इन्स्ट्रुमेंट कंपनीचे सहसंस्थापक (निधन: ४ मार्च १९८५)

१८६८: हरीश्चंद सखाराम भाटवडेकर - चलत चित्रपटाचे प्रवर्तक

आज यांची पुण्यतिथी

२०२०: जेवियर पेरेझ डी क्युलर - पेरू देशाचे पंतप्रधान आणि संयुक्त राष्ट्रांचे पाचवे महासचिव (जन्म: १९ जानेवारी १९२०)

२०११: अर्जुनसिंग - मध्यप्रदेशचे १२वे मुख्यमंत्री (जन्म: ५ नोव्हेंबर १९३०)

२००७: सुनील कुमार महातो - भारतीय संसद सदस्य

२०००: गीता मुखर्जी - स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या (जन्म: ८ जानेवारी १९२४)

१९९७: रॉबर्ट इह. डिक - अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ

१९९६: आत्माराम सावंत - नाटककार आणि पत्रकार

१९९५: इफ्तिखार - भारतीय चरित्र अभिनेते (जन्म: २२ फेब्रुवारी १९२०)

१९८५: चार्ल्स हर्बर्ट कॉल्विन - पायोनियर इन्स्ट्रुमेंट कंपनीचे सहसंस्थापक (जन्म: ४ मार्च १८९३)

१९८५: डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे - साहित्यिक

१९७६: वॉल्टर शॉटकी - जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २३ जुलै १८८६)

१९५२: सर चार्ल्स शेरिंग्टन - ब्रिटिश जैवरसायनशात्रज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म: २७ नोव्हेंबर १८५७)

१८५२: निकोलय गोगोल - रशियन नाटककार आणि कथा कादंबरीकार

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Jacqueline Fernandez : दिल्ली उच्च न्यायालयाचा अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला झटका; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील याचिका फेटाळली

Iran - Israel War : 'विश्वसनीय हमी दिल्याशिवाय कोणत्याही चर्चेला अर्थ नाही'; इराणच्या राजदूतांनी दिला तेहरानच्या अटींवर भर

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Fake Crop Insurance : नांदेडमधील 'बोगस' पीक विमा घोटाळा उघड; बीडचे 9 एजंट, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावानेही विमा