लोकशाही स्पेशल

दिनविशेष 09 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मे महिना सुरू झाला आहे, तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published by : Dhanshree Shintre

Dinvishesh 09 April 2024 : सध्या मे महिना सुरू झाला आहे. तर मे महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 09 मे रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

१९९९: अटलांटा ग्रांप्री नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रुपी उन्नीकृष्णनने प्रोन गटात रौप्यपदक पटकाविले.

१९५५: पश्चिम जर्मनी देशाचा नाटो (NATO) मधे प्रवेश.

१९३६: इटलीने इथिओपिया देश बळकावला.

१९०४: वाफेवर चालणारे सिटी ट्रुरो हे इंजिन १६० किमी ताशी पेक्षा जास्त वेगाने धावणारे यूरोपमधील पहिले इंजिन बनले.

१८७७: पेरू देशाच्या किनारपट्टीवरील झालेल्या ८.८ तीव्रतेच्या भूकंपामुळे २५४१ लोक ठार झाले.

१८७४: मुंबईत घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या ट्राम सुरू झाल्या.

आज यांचा जन्म

१९३९: केन वॉर्बी - ऑस्ट्रेलियन मोटरबोट रेसर, पाण्यावरील २७५.९७ नॉट्स वेगाचा जागतिक विक्रम करणारे

१९२८: वसंत नीलकंठ गुप्ते - समाजवादी कामगारनेते, लेखक व समाजवादाचे अभ्यासक (निधन: ९ सप्टेंबर २०१०)

१८८६: केशवराव मारुतराव जेधे - स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते (निधन: १२ नोव्हेंबर १९५९)

१८८२: हेन्री जे. कैसर - कैसर शिपयार्ड आणि कैसर एल्युमिनियमचे संस्थापक (निधन: २४ ऑगस्ट १९६७)

१८६६: गोपाल कृष्ण गोखले - भारतीय थोर समाजसेवक (निधन: १९ फेब्रुवारी १९१५)

१८१४: दादोबा पांडुरंग तर्खडकर - इंग्लिश व्याकरणकार, ग्रंथकार व धर्मसुधारक (निधन: १७ ऑक्टोबर १८८२)

१५४०: महाराणा प्रताप - मेवाडचे महाराजा (निधन: १९ जानेवारी १५९७)

आज यांची पुण्यतिथी

२०१४: नेदुरुमल्ली जनार्दन रेड्डी - भारतीय राजकारणी (जन्म: २० फेब्रुवारी १९३५)

२००८: पं. फिरोझ दस्तूर - किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक

१९९९: करमसीभाई जेठाभाई सोमय्या - उद्योगपती

१९९५: अनंत माने - मराठी चित्रपट दिग्दर्शक (जन्म: २२ सप्टेंबर १९१५)

१९८६: शेर्पा टेन्झिंग नॉर्गे - एडमंड हिलरी यांच्यासोबत सगळ्यात पहिल्यांदा माउंट एव्हरेस्ट शीखर सर करणारे गिर्यारोहक (जन्म: २९ मे १९१४)

१९७६: उल्रिक मेनहॉफ - जर्मन अत्यंत डावे दहशतवादी, रेड आर्मी गटाचे सहसंस्थापक, पत्रकार (जन्म: ७ ऑक्टोबर १९३४)

१९५९: कर्मवीर भाऊराव पाटील - भारतीय शिक्षणतज्ज्ञ - पद्म भूषण (जन्म: २२ सप्टेंबर १८८७)

१९३१: अल्बर्ट मायकेलसन - जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक - नोबेल पुरस्कार (जन्म: १९ डिसेंबर १८५२)

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Google Online Courses : गुगलच्या 'या' मोफत कोर्सेसमुळे करिअरमध्ये प्रगतीची संधी

Rohit Pawar On ED Action : '...आणि म्हणून माझ्या एकट्यावर EDची कारवाई केली' रोहित पवारांनी सगळंच सांगितलं

Sambhajiraje Chhatrapati : 'युनेस्को गडकिल्ल्यांचे ब्रँडींग करेल, जतन आपल्याला करायचंय'; छत्रपती संभाजीराजेंची प्रतिक्रिया

Morning Tea Habits : रिकाम्या पोटी चहा पिताय ? मग 'या' गोष्टी ध्यानात घ्या अन्यथा...