सध्या जून महिना सुरू झाला आहे. तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 14 जून या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.
14 जून घटना - दिनविशेष
2004:जागतिक रक्तदाता दिन
2001 : ए. सी. किंवा डी. सी. यापैकी कोणत्याही विद्युतप्रवाहावर चालणाऱ्या;या उपनगरी गाडीचा शुभारंभ पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक वासुदेव गुप्ता यांच्या हस्ते झाले.
1999: नेल्सन मंडेला - यांचा दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष म्हणून कायर्काळ संपला.
1972: अमेरिका - देशात डी. डी. टी. या कीटकनाशकाच्या वापरावर बंदी घालण्यात आली.
1972: जपान एअरलाइन्सचे फ्लाइट ४७१ अपघातात ८२ प्रवासी आणि ४ जमीन कर्मचारी लोकांचे निधन.
1967: चीन - देशाने पहिल्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली.
1967: मरिनर प्रोग्रॅम - मरिनर अंतराळ यान शुक्राकडे प्रक्षेपित.
1962: युरोपियन स्पेस एजंसी - पॅरिसमध्ये युरोपियन अंतराळ संशोधन संस्था स्थापन पुढे नामकरण करून युरोपियन स्पेस एजंसी बनली.
1952: अमेरिका - देशाने अणुशक्तीवर चालणारी पहिली पाणबुडी यू. एस. एस. नॉटिलस बांधण्यास सुरुवात केली.
1945: वेव्हेल योजना - या योजने अंतर्गत भारताला स्वायत्तता देण्याचे जाहीर.
1945: दुसरे महायुद्ध - बेसांग पासची लढाई: सुरू.
1944: दुसरे महायुद्ध - ऑपरेशन पेर्च: अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर, ब्रिटीश सैन्याने जर्मनीच्या ताब्यात असलेले केन शहर काबीज करण्याची त्यांची योजना बंद केली.
1940: दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांनी पॅरिस जर्मनीच्या हवाली केले.
1938: सुपरमॅन - चित्रपट कथा पहिल्यांदा प्रकाशित.
1926: लीग ऑफ नेशन्स - या संस्थेतून ब्राझील देश बाहेर निघाला.
1907: नॉर्वे - देशात स्त्रियांना मतदानाचा अधिकार.
1896: अनाथ बालिकाश्रम - स्थापना.
1789: बोर्बोन व्हिस्की - मक्यापासुन पहिल्यांदाच ही व्हिस्की तयार करण्यात आली.
1777: अमेरिका - स्टार्स अँड स्ट्राइप्स या ध्वजाचा स्वीकार केला
1704: मराठा साम्राज्य - मुघलांच्या कैदेत असलेल्या संभाजीराजे यांच्या मुलाचे औरंगजेबाने लग्न लावून दिले.
1158 : म्यूनिच, जर्मनी - इसार नदीच्या काठावर या शहराची स्थापना.
14 जून जन्म - दिनविशेष
1969: स्टेफी ग्राफ - प्रसिद्ध जर्मन टेनिस खेळाडू
1968 : राज ठाकरे - (अध्यक्ष) महाराष्ट्र नवनिर्माण सेना
1952: किरोण खेर - भारतीय राजकारणी, चित्रपट अभिनेत्री - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९५१: पॉल बोटेंग - ग्रेट ब्रिटन मधील पहिले कृष्णवर्णीय कॅबिनेट मंत्री
1946 : डोनाल्ड ट्रम्प - अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष, उद्योगपती
1944: के. मुरारी - भारतीय चित्रपट निर्माते (निधन: १५ ऑक्टोबर २०२२)
1932: टी. शिवदासा मेनन - भारतीय राजकारणी, केरळचे आमदार (निधन: २८ जून २०२२)
1928: चे गुएवारा - क्युबन क्रांतिकारी (निधन: ९ ऑक्टोबर १९६७)
1922: के. आसिफ - हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथा लेखक
1868: कार्ल लॅन्ड्स्टायनर - ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (निधन: २६ जून १९४३)
1864: अलॉइस अल्झायमर - अल्झायमर आजाराचे संशोधक (निधन: १९ डिसेंबर १९१५)
1736: चार्ल्स कुलोम - फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ (निधन: २३ ऑगस्ट १८०६)
1444: निळकंथा सोमायाजी - भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ
14 जून निधन - दिनविशेष
2020: सुशांतसिंग राजपूत - सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय भारतीय अभिनेते (जन्म: २१ जानेवारी १९८६)
2020: राज मोहन वोहरा - लेफ्टनंट जनरल - महावीरचक्र, परम विशिष्ट सेवा पदक (जन्म: ७ मे १९३२)
2010: मनोहर माळगावकर - इंग्रजी लेखक (जन्म: १२ जुलै १९१३)
2007: कुर्त वाल्ढहाईम - संयुक्त राष्ट्रांचे चौथे सरचिटणीस (जन्म: २१ डिसेंबर १९१८)
1989: पंडित सुहासिनी मुळगावकर - मराठी अभिनेत्री संस्कृत
1946: जॉन लोगे बेअर्ड - दूरचित्रवाणी (Television)चे संशोधक (जन्म: १३ ऑगस्ट १८८८)
1920: मॅक्स वेबर - जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ (जन्म: २१ एप्रिल १८६४)
1916: गोविंद बल्लाळ देवल - भारतीय मराठी नाटककार (जन्म: १३ नोव्हेंबर १८५५)
1825: पिअर चार्ल्स एल्फांट - फ्रेन्च-अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंते (जन्म: ९ ऑगस्ट १७५४)