16th June 2023 Dinvishesh Team Lokshahi
लोकशाही स्पेशल

17th June 2023 Dinvishesh : 17 जून दिनविशेष, जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्वाच्या घटना

कॅलेंडरमधील प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व असतं. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत.

Published by : Sagar Pradhan

16th June 2023 Dinvishesh: सध्या जून महिना सुरू झाला आहे. तर जून महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 17 जून या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं

२०२२: एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट - इंग्लिश पुरुष क्रिकेट संघाने नेदरलँड्स विरुद्ध ४९८ इतक्या सर्वात जास्त धाव केल्या.

२०२२: चीन - फुजियान या तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकाचे लोकार्पण.

१९९१: राजीव गांधी - यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.

१९८५: स्पेस शटल प्रोग्राम - STS-51-G मिशन: अंतराळात जाणारे सुलतान बिन सलमान अल सौद हे पहिले अरब आणि पहिले मुस्लिम बनले.

१९६७: चीन - देशाने पहिल्या हायड्रोजन बॉम्बच्या यशस्वी चाचणीची घोषणा केली.

१९६३: अमेरिका - सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक शाळांतून बायबलचे पठण करणे कायदेबाह्य ठरवले.

१९४४: आइसलँड - देशाने डेन्मार्कपासून स्वातंत्र्य घोषित केले आणि ते प्रजासत्ताक बनले.

१९४०: दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांनी फ्रान्समधुन माघार घेण्यास सुरूवात केली.

१९४०: दुसरे महायुद्ध - आर.एम.एस. लँकास्ट्रिया जहाज बुडाले. यात किमान ३,००० लोकांचे निधन.

१९४०: दुसरे महायुद्ध - ब्रिटीश सैन्याने फोर्ट कॅपुझो, लिबिया इटालियन सैन्याकडून जिंकून घेतला.

१८८५: न्यू यॉर्क बंदरमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे आगमन झाले.

१६३१: मुमताज - ज्यांच्या साठी ताजमहाल बांधला त्यांचे बाळाला जन्म देताना निधन.

आज यांचा जन्म

१९८१: शेन वॉटसन - ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू

१९७३: लिएंडर पेस - भारतीय टेनिसपटू - पद्म भूषण, पद्मश्री, खेलरत्न, ऑलम्पिक ब्रॉन्झ मेडल विजेते

१९२०: फ्रांस्वा जेकब - फ्रेंच जीवशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक

१९१२: नित्यानंद महापात्रा - भारतीय पत्रकार आणि राजकारणी (निधन: १७ एप्रिल २०१२)

१९०३: रुथ ग्रेव्हस वेकफिल्ड - चॉकोलेट चिप कुकीचे निर्माते (निधन: १० जानेवारी १९७७)

१९०३: बाबूराव विजापुरे - संगीतशिक्षक (निधन: ७ डिसेंबर १९८२)

१८९८: कार्ल हेर्मान - जर्मन भौतिकशास्त्रज्ञ

१८६७: जॉनरॉबर्ट ग्रेग - लघुलेखन पद्धतीचे शोधक

१७०४: जॉन के - फ्लाइंग शटलचे शोधक

१२३९: एडवर्ड (पहिला) - इंग्लंडचा राजा (निधन: ७ जुलै १३०७)

आज यांची पुण्यतिथी

२००४: इंदुमती पारीख - सामाजिक कार्यकर्त्या

१९९६: बाळासाहेब देवरस - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ३रे सरसंघचालक (जन्म: ११ डिसेंबर १९१५)

१९८३: शरद पिळगावकर - चित्रपट निर्माते, दिग्दर्शक

१९६५: मोतीलाल - अभिनेते (जन्म: ४ डिसेंबर १९१०)

१९२८: गोपबंधु दास - भारतीय समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसेनानी (जन्म: ९ ऑक्टोबर १८७७)

१८९५: गोपाल गणेश आगरकर - थोर समाजसुधारक (जन्म: १४ जुलै १८५६)

१८९३: जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक - भारताचे १४ वे राज्यपाल (जन्म: १४ सप्टेंबर १७७४)

१६७४: जिजाबाई - मराठा साम्राज्याच्या राजमाता (जन्म: १२ जानेवारी १५९८)

१६३१: मुमताज महल - शाहजहानची पत्नी (जन्म: २७ एप्रिल १५९३)

१२९७: श्री निवृत्तीनाथ महाराज - ज्येष्ठ गुरु संत (जन्म: २९ जानेवारी १२७४)

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक